सहकाऱ्यासोबत जेवण करून गप्पा मारल्यानंतर जवानाने उचलले धक्कादायक पाऊल

 औरंगाबाद: आपल्या सहकाऱ्यासोबत जेवण करून गप्पा मारल्यानंतर लष्करी जवानाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी सकाळी सहाच्या सुमारास छावणीतील लष्कर परिसरात उघडकीस आली.

मल्हार राममूर्ती (२६, रा. कृष्णगिरी, तामिळनाडू, ह. मु. लष्कर निवास्थान ) असे मृत जवानाचे नाव आहे. मल्हार यांनी शनिवारी रात्री सहकाऱ्यांसह नेहमीप्रमाणे जेवण केले. त्यानंतर हसतखेळत त्यांच्याशी गप्पा मारल्या. सर्व झोपी गेल्यानंतर मल्हार यांनी लाइनमनकडे असलेल्या दोरीने गळफास घेतला. सकाळी सहाच्या सुमारास सहकारी उठल्यानंतर हा प्रकार उघडकिस आला. त्यांनी ही माहिती वरिष्ठांना दिली. त्यानंतर सुभेदार पोपट जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी मल्हार यांना बेशुद्धावस्थेत घाटीत दाखल केले. मात्र, सकाळी पावणेनऊच्या सुमारास डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मल्हार यांनी आत्महत्या का केली, हे मात्र अस्पष्ट आहे. त्यांच्या अकस्मात मृत्यूची नोंद छावणी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

    Post a Comment

    0 Comments
    * Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

    Ads Area