आगामी 2021-22 जनगणनेत आंबेडकरी समाज स्वतःच्या आरक्षणावर हातोडा मारण्याच्या तयारीत 🔨 💥

येत्या काही महिन्यात जनगणनेची प्रकिया चालू होऊ शकते . समाज माध्यमावर पोस्ट शेअर करतात की , जनगणनेत फक्त धर्माचा उल्लेख करावा ,, तर काही म्हणतात की जात आणि धर्म वेगळे लिहावेत . जनगणना आणि आरक्षण यांचा काय संबंध यावरच हा पूर्ण लेख . कृपया शेवट पर्यंत वाचावा .🎯 जनगणना 2021 ही डिजिटल ( मोबाईल अँप ) पद्धतीद्वारे नोंदणी केली जाईल .🎯 1990 च्या आदेशानुसार अनुसूचित जातीतील (SC ) व्यक्ती हिंदु ,शीख ,बौद्ध या तीन धर्माचे पालन करणाऱ्याना अनुसूचित जाती ( SC ) चा लाभ घेता येईल .


🎯 परिसीमन आयोग ( Delimitation Commission )

परिसीमन आयोगाचे महत्वाचे काम म्हणजे नव्याने लोकसंख्येच्या आधारावर लोकसभा आणि विधानसभा  मतदारसंघाची निर्मिती करणे . असुसूचित जाती ( SC ) , अनुसूचित जमाती ( ST ) साठी त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात राखीव जागा ठेवणे . मागील परिसीमन 2008 ला झाले होते . यासाठी 2001 च्या जनगणनेचा आधारावर नव्याने मतदारसंघाची निर्मिती झाली होती . 2004 ला देशात लोकसभा मतदारसंघ 543 होते ,, तेच 2009 ला सारखेच 543 होते . 2004 ला अनुसूचित जाती साठी 79 जागा राखीव होते . ते 2008 च्या परिसीमन नंतर 84 ( +5 ) झाल्या .अनुसूचित जमाती साठी 2004 लोकसभेत 41 जागा राखीव होत्या . 2008 च्या परिसीमन नंतर 47 ( +6 ) जागा वाढल्या . पुढील परिसीमन 2026 ला होणार . हे परिसीमन मागील म्हणजेच 2021 च्या जनगणनेवर आधारित आकड्यावर होणार आहे .


🎯 2011 जनगणना आकडेवारी


💡 देशाची लोकसंख्या एकूण - 121 करोड

💡 देशातील अनुसूचित जाती ( SC ) लोकसंख्या एकूण - 20 करोड ( 15% )

💡 देशातील बौद्ध धर्मातिल लोकांची लोकसंख्या एकूण - 84 लाख ( 0.8% ) फक्त


राज्य नुसार आकडेवारी


💡 महाराष्ट्र

महाराष्ट्रातील अनुसूचित जाती ( SC ) लोकसंख्या एकूण  - 1.32 करोड

अनुसूचित जातीतील ( SC ) जात-नुसार लोकसंख्या -

1 ) महार - 80 लाख

2 ) मातंग - 24.88 लाख

3 ) चांभार - 14 लाख

4 ) इतर 56 जातीची लोकसंख्या - 13 लाख


बौद्ध धर्माची लोकसंख्या एकूण - 65 लाख फक्त


💡 उत्तर प्रदेश

अनुसूचित जातीतील लोकसंख्या एकूण - 4 करोड

अनुसूचित जातीतील जात-नुसार लोकसंख्या -

1 ) चमार - 2.25 करोड

2 ) पासी - 65 लाख

3 ) धोबी - 25 लाख

4 ) कोरी - 23 लाख

5 ) वाल्मिकी - 13 लाख

6 ) खाटीक - 10 लाख

7 ) अनुसूचित जातीतील इतर जातीची लोकसंख्या - 52 लाख


बौद्ध धर्माची लोकसंख्या - 2 लाख फक्त


💡 बिहार

अनुसूचित जातीतील लोकसंख्या एकूण - 1.65 करोड

अनुसूचित जातीतील जात-नुसार लोकसंख्या -

1 ) चमार - 49 लाख

2 ) दुसाध - 51 लाख

3 ) मुसाहर - 27 लाख

4 ) पासी - 9 लाख

5 ) अनुसूचित जातीतील इतर जातीची लोकसंख्या - 30 लाख


बौद्ध धर्मातील लोकांची लोकसंख्या -  25 हजार फक्त


💡 आंध्रप्रदेश ( तेलंगणा समाविष्ट )

अनुसूचित जातीतील लोकसंख्या एकूण- 1.38 करोड

अनुसूचित जातीतील जात-नुसार लोकसंख्या -

1 ) मादिगा - 67 लाख

2 ) माला - 55 लाख

3 ) अनुसूचित जातीतील इतर जातीची लोकसंख्या - 16 लाख


बौद्ध धर्माची लोकसंख्या - 36 हजार फक्त


💡 तामिळनाडू

अनुसूचित जातीतील लोकसंख्या एकूण- 1.44 करोड

अनुसूचित जातीतील जात-नुसार लोकसंख्या -

1 ) आदि द्रविडा - 72 लाख

2 ) पल्लन - 23 लाख

3 ) अरुंथियार - 11 लाख

4 ) अनुसूचित जातीतील इतर जातीची लोकसंख्या - 38 लाख


बौद्ध धर्माची लोकसंख्या - 11 हजार फक्त


💡 कर्नाटक

अनुसूचित जातीतील लोकसंख्या एकूण - 1.04 करोड

अनुसूचित जातीतील जात-नुसार लोकसंख्या -

1 ) आदि कर्नाटका - 30 लाख

2 ) आदि द्रविडा - 8 लाख

3 ) लांबनी / लांबडा - 9 लाख

4 ) मादीगा - 10 लाख

5 ) अनुसूचित जातीतील इतर समाजाची लोकसंख्या - 47 लाख


बौद्ध धर्माची लोकसंख्या - 95 हजार फक्त


💡 गुजरात

अनुसूचित जातीतील लोकसंख्या एकूण - 40 लाख

अनुसूचित जातीतील जात-नुसार लोकसंख्या -

1 ) माह्यावंशी - 16 लाख

2 ) चमार / भांबी - 10 लाख

3 ) भंगी / मेहतर - 5 लाख

4 ) अनुसूचित जातीतील इतर जातीची लोकसंख्या - 4 लाख


बौद्ध धर्माची लोकसंख्या - 30 हजार फक्त


💡 राजस्थान

अनुसूचित जातीतील जातीची लोकसंख्या एकूण - 1.22 करोड

अनुसूचित जातीतील जात-नुसार लोकसंख्या -

1 ) मेघवाल -30 लाख

2 ) चमार - 24 लाख

3 )   बैरवा - 12 लाख

4 )   थोरी - 8 लाख

5 )   अनुसूचित जातीतील इतर जातीची लोकसंख्या - 48 लाख


बौद्ध धर्माची लोकसंख्या - 12 हजार फक्त


💡 मध्य प्रदेश

अनुसूचित जातीतील लोकसंख्या एकूण - 1.13 करोड

अनुसूचित जातीतील जात-नुसार लोकसंख्या -

1 ) चमार - 53 लाख

2 )  बलाई - 13 लाख

3 ) महार - 8 लाख

4 )  अनुसूचित जातीतील इतर जातीची लोकसंख्या - 39 लाख


बौद्ध धर्माची लोकसंख्या - 2.16 लाख


💡 छत्तीसगढ

अनुसूचित जातीतील लोकसंख्या एकूण- 32 लाख

अनुसूचित जातीतील जात-नुसार लोकसंख्या -

1 ) चमार - 23 लाख

2 )   गंडा - 4 लाख

3 ) महार -2.5 लाख

4 ) अनुसूचित जातीतील इतर जातीची लोकसंख्या - 50 हजार


बौद्ध धर्माची एकूण लोकसंख्या - 70 हजार फक्त


💡 पश्चिम बंगाल

अनुसूचित जातीतील लोकसंख्या एकूण- 2.14 करोड

अनुसूचित जातीतील जात-नुसार लोकसंख्या -

1 ) राजबांशी - 38 लाख

2 ) नामसुद्रा - 35 लाख

3 ) बागडी - 30 लाख

4 ) पोड - 25 लाख

5 ) चमार - 10 लाख

6 ) इतर अनुसूचित जातीतील जातीची लोकसंख्या - 76 लाख


बौद्ध धर्माची एकूण लोकसंख्या - 2.82 लाख फक्त


💡 दिल्ली

अनुसूचित जातीतील लोकसंख्या एकूण -  28 लाख

अनुसूचित जातीतील जात-नुसार लोकसंख्या -

1 ) चमार - 10.75 लाख

2 ) वाल्मिकी - 6 लाख

3 ) इतर अनुसूचित जातीतील जातीची लोकसंख्या - 11 लाख


बौद्ध धर्माची एकूण लोकसंख्या - 18 हजार फक्त


💡 हरियाणा


अनुसूचित जातीच्या लोकसंख्या एकूण - 51 लाख

अनुसूचित जातीतील जात-नुसार लोकसंख्या -

1 ) चमार - 24 लाख

2 ) वाल्मीकी - 10 लाख

3 ) इतर अनुसूचित जातीतील जातीची लोकसंख्या - 17 लाख


बौद्ध धर्माची एकूण लोकसंख्या - 7 हजार फक्त


💡 महाराष्ट्रातील अनुसूचित जातीतील लोकचं फक्त धर्माचा कॉलम मध्ये बौद्ध धर्म नोंदवतात आणि बाकीच्या राज्यातील अनुसूचित जातीचे लोक हिंदू च नोंदवतात म्हणून आपल्याला देशात बौद्धांची लोकसंख्या इतकी कमी दिसते .आपल्याला इतर राज्यातील लोकांना जागरूक करून दिले पाहिजे की जातीच्या कॉलम मध्ये अनुसूचित जाती ( SC ) तील जात आणि धर्माचा कॉलम मध्ये हिंदू च्या एवजी बौद्ध धर्माची नोंद करायला . तेव्हाच बौद्धांची लोकसंख्या स्पष्ट दिसेल . उत्तर भारतात चमार (आंबेडकरवादी ) जातीची लोकसंख्या ही करोडोच्या घरात आहे पण बौद्धांची लोकसंख्या काहीशी दाखवते .


🎯 आरक्षण


आरक्षण हे तीन प्रकारचे असतात 


( 1 ) राजकीय आरक्षण 

( 2 ) शिक्षणातील आरक्षण

( 3 ) नौकरीतील आरक्षण


यातील राजकीय आरक्षण सरकारला दर 10 वर्षांनी वाढवण्याचा अधिकार आहे . पण शिक्षण आणि नौकरीतील आरक्षण हे कायमचे आहे .


💡 राजकीय आरक्षण

1 )  लोकसभा -

लोकसभा जागा एकूण - 543 .

2004 ला अनुसूचित जाती साठी राखीव जागा एकूण - 79

महाराष्ट्रातील अनुसूचित जाती साठी राखीव जागा एकूण - 3 ( बुलढाणा ,पंढरपूर ,उस्मानाबाद )


2008 परिसीमन नंतर


2009 लोकसभा अनुसूचित जातीतील राखीव जागा एकूण - 84(+5) वाढ

महाराष्ट्रातील लोकसभेच्या अनुसूचित जातीसाठी राखीव जागा एकूण - 5(+2) - रामटेक ( नागपूर जिल्हा ) ,अमरावती ,शिर्डी (अहमदनगर जिल्हा ) ,लातूर ,सोलापूर


देशात उत्तर प्रदेश राज्यात 80 पैकी 17 जागा अनुसूचित जाती ( SC ) साठी राखीव .


2019 लोकसभा मध्ये 86 अनुसूचित जाती (SC ) तिल सदस्य निवडून आले . 84 जागा तर ( SC ) साठी राखीव आहेत .54 सदस्य हे अनुसूचित जमाती ( ST ) चे आहेत , 47 जागा (ST ) साठी राखीव आहेत . आरक्षित जागा आहे म्हणून ( SC & ST ) चे सदस्य एवढे तरी आहे , राखीव नसते तर संख्याबळ वेगळेच असते .


2 ) विधानसभा 


💡  महाराष्ट्र

विधानसभा संख्या एकूण - 288

2004 विधानसभा अनुसूचित जाती ( SC ) साठी राखीव जागा एकूण - 18


1 ) धारावी ( मुंबई ) 

2 ) देवळाली ( जिल्हा - नाशिक )

3 ) चाळीसगाव ( जिल्हा - जळगाव )

4 ) वाशीम ( जिल्हा - वाशीम )

5 ) नागपूर उत्तर ( जिल्हा - नागपूर )

6 ) तिरोडा ( जिल्हा - गोंदिया )

7 ) मुखेड ( जिल्हा - नांदेड ) 

8 ) गंगाखेड ( जिल्हा - परभणी )

9 ) केज ( जिल्हा - बीड )

10 ) हेर

11 ) कळंब 

12 ) उत्तर सोलापूर ( जिल्हा - सोलापूर ) 

13 ) मंगळवेढा ( जिल्हा - सोलापूर )

14 ) कर्जत ( जिल्हा - अहमदनगर )

15 ) पार्वती ( जिल्हा - पुणे ) 

16 ) माण ( जिल्हा - सातारा )

17 ) जत ( जिल्हा - सांगली )

18 ) वडगाव


अनुसूचित जमाती ( ST ) साठी राखीव जागा एकूण - 22


2008 परिसीमन नंतर


2009 विधानसभा एकूण जागा - 288

अनुसूचित जाती ( SC ) साठी राखीव जागा एकूण - 29(+11)


1 ) भुसावळ ( जिल्हा - जळगाव )

2 ) मेहकर ( जिल्हा - बुलढाणा ) 

3 ) मुर्तिजापूर ( जिल्हा - अकोला )

4 ) वाशीम ( जिल्हा - वाशीम )

5 ) दर्यापूर ( जिल्हा - अमरावती )

6 ) उमरेड ( जिल्हा - नागपूर ) 

7 ) नागपूर उत्तर ( जिल्हा - नागपूर )

8 ) भंडारा ( जिल्हा - भंडारा ) 

9 ) अर्जुनी मोरगाव ( जिल्हा - गोंदिया )

10 ) चंद्रपूर ( जिल्हा - चंद्रपूर )

11 ) उमरखेड ( जिल्हा - यवतमाळ ) 

12 ) देगलूर ( जिल्हा - नांदेड )

13 ) बदनापूर ( जिल्हा - जालना )

14 ) औरंगाबाद पश्चिम ( जिल्हा - औरंगाबाद )

15 ) देवळाली ( जिल्हा - नाशिक ) 

16 ) अंबरनाथ ( जिल्हा - ठाणे )

17 ) कुर्ला ( मुंबई )

18 ) धारावी ( मुंबई ) 

19 ) पिंपरी ( जिल्हा - पुणे )

20 ) पुणे कॅन्टोन्मेंट ( जिल्हा - पुणे )

21 ) श्रीरामपूर ( जिल्हा - अहमदनगर )

22 ) केज ( जिल्हा - बीड )

23 ) उदगीर ( जिल्हा - लातूर ) 

24 ) उमरगा ( जिल्हा - उस्मानाबाद )

25 ) मोहोळ ( जिल्हा - सोलापूर )

26 ) माळशिरस ( जिल्हा - सोलापूर )

27 ) फलटण ( जिल्हा - सातारा )

28 ) हातकणंगले ( जिल्हा - कोल्हापूर )

29 ) मिरज ( जिल्हा - सांगली )


राज्य           । SC & ST जागा  


उत्तर ( 403 )   । 83 & 0

प्रदेश


बिहार  ( 243 )। 38 & 2


तेलंगणा           । 15 & 11

( 119 )


आंध्र प्र            ।   29 & 7

( 175 )


तामिळनाडू      ।  44 & 2

( 234 )


केरळ              । 14 & 2

( 140 )


कर्नाटक          । 31 & 15

( 224 ) 


दिल्ली             । 12 & 0

( 70 )


हरियाणा         । 17 & 0

( 90 )


पंजाब             । 32 & 0

( 117 )


राजस्थान        । 33 & 25

( 200 )


गुजरात           । 13 & 27

( 182 )


मध्य प्रदेश       । 35 & 47

( 230 )


छत्तीसगड       । 10 & 29

( 90 )


ओडिशा          । 24 & 33

( 147 )


झारखंड          । 9 & 28

( 84 )


आसाम           । 8 & 16

( 126 )


नागालँड         । 0 & 59

( 60 )


अरुणाचल      । 0 & 59

प्रदेश 

( 60 )


मेघालय         । 0 & 56

( 60 ) 


मिझोराम       । 0 & 39

( 40 )


अनुसूचित जमाती ( ST ) साठी राखीव जागा एकूण - 25(+3)


राज्यसभेत आणि विधानपरिषद यामध्ये आरक्षण वैगरे नसते


राज्यसभेत 245 सदस्य पैकी अनुसूचित जातीतील ( SC ) फक्त 10 सदस्य ( 4% ) आणि अनुसूचित जमाती ( ST ) फक्त 14 सदस्य ( 6% ) आहेत .


तीच स्थिती विधानपरिषदेत आहे . SC & ST चे हातावर मोजण्याइतके सदस्य आहेत .


💡 शिक्षण आणि नौकरी


संपूर्ण देशात अनुसूचित जाती (SC ) 15 % , जमाती ( ST ) 7.5% लोकसंख्या आहे . केंद्र सरकार मध्ये त्यांना त्यांचा संख्येनुसार आरक्षण उर्वरित 27 % इतर मागास प्रवर्ग ( OBC ) ,, आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्ग ( EWS ) - ( खुल्या प्रवर्गातील गरीब घटकासाठी ) 10 % राखीव आरक्षण आहे . केंद्र सरकारचे एकूण आरक्षण 59.5 % आहे .


सध्या देशात 23 IIT ( इंजिनीअरिंग ) संस्थान आहेत . शैक्षणिक वर्ष 2020-21 - 


सीट एकूण - 16,053

SC साठी एकूण - 2407 ( 15% )

ST साठी एकूण - 1210 ( 7.5% )

OBC साठी एकूण - 4329 ( 27% )

EWS साठी एकूण - 1573 ( 10% )

सामान्य साठी एकूण ( गुणवत्तेनुसार कोणताही विद्यार्थी ) - 6534 ( 40.5% )


💡 राज्याचे आरक्षण


आरक्षणाची टक्केवारी त्या राज्यातील प्रवर्गाचा लोकसंख्येच्या प्रमाणावर असते .


महाराष्ट्र

SC लोकसंख्या 13% - आरक्षण 13%

ST लोकसंख्या 7% - आरक्षण 7 टक्के

उर्वरित 50 % तिल आरक्षण OBC साठी

अधिक ( EWS ) ( आर्थिक दुर्बल घटक ) - 10 % आरक्षण


उत्तर प्रदेश

SC लोकसंख्या 20% - आरक्षण 20%

ST लोकसंख्या 0.5% - आरक्षण 1%

50% तील उर्वरित आरक्षण OBC साठी

10% - EWS ( आर्थिक दुर्बल घटकासाठी )


बिहार


SC लोकसंख्या 15% - आरक्षण 15%

ST लोकसंख्या 0.5% - आरक्षण 1%

50% तील उर्वरित आरक्षण OBC साठी

10% - EWS ( आर्थिक दुर्बल घटकासाठी )


आंध्र प्रदेश (तेलंगणा समाविष्ट )


SC लोकसंख्या 15% - आरक्षण 15%

ST लोकसंख्या 6% - आरक्षण 6%

50% तील उर्वरित आरक्षण OBC साठी

10% आरक्षण - EWS ( आर्थिक दुर्बल घटकासाठी )


तामिळनाडू


SC लोकसंख्या 19% - आरक्षण 19% 

ST लोकसंख्या 1% - आरक्षण 1%


केरळ


SC लोकसंख्या 8% - आरक्षण 8%

ST लोकसंख्या 2% - आरक्षण 2%

50% तील उर्वरित आरक्षण OBC साठी

10% आरक्षण EWS ( आर्थिक दुर्बल घटकासाठी ) 


कर्नाटक


SC लोकसंख्या 15% - आरक्षण 15%

ST लोकसंख्या 3% - आरक्षण 3%

50% तील उर्वरित आरक्षण OBC साठी

10% आरक्षण EWS ( आर्थिक दुर्बल घटकासाठी )


हरियाणा


SC लोकसंख्या 20% - आरक्षण 20%

ST लोकसंख्या 0% - आरक्षण 0%

50% तील उर्वरित आरक्षण OBC साठी

10% आरक्षण EWS ( आर्थिक दुर्बल घटकासाठी )


पंजाब


SC लोकसंख्या 29% - आरक्षण 29%

ST लोकसंख्या 0% - आरक्षण 0%

50% तील उर्वरित आरक्षण OBC साठी


पश्चिम बंगाल


SC लोकसंख्या 22% - आरक्षण 22%

ST लोकसंख्या 6% - आरक्षण 6%


राजस्थान


SC लोकसंख्या 16% - आरक्षण 16%

ST लोकसंख्या 12% - आरक्षण 12%

50% तील उर्वरित आरक्षण OBC साठी


गुजरात


SC लोकसंख्या 7.5% - आरक्षण 7.5%

ST लोकसंख्या 15% - आरक्षण 15%

50% तील उर्वरित आरक्षण OBC साठी

10% आरक्षण EWS ( आर्थिक दुर्बल घटकासाठी )


मध्य प्रदेश


SC लोकसंख्या 16% - आरक्षण 16%

ST लोकसंख्या 20% - आरक्षण 20%

50% तील उर्वरित आरक्षण OBC साठी

10% आरक्षण EWS ( आर्थिक दुर्बल घटकासाठी )


छत्तीसगड


SC लोकसंख्या 10% - आरक्षण 10%

ST लोकसंख्या 32% - आरक्षण 32%

50% तील उर्वरित आरक्षण OBC साठी


ओडिशा


SC लोकसंख्या 16% - आरक्षण 16%

ST लोकसंख्या 22% - आरक्षण 22%

50% तील उर्वरित आरक्षण OBC साठी


झारखंड


SC लोकसंख्या 10% - आरक्षण 10%

ST लोकसंख्या 26% - आरक्षण 26%

50% तील उर्वरित आरक्षण OBC साठी


आसाम


SC लोकसंख्या 7% - आरक्षण 7%

ST लोकसंख्या 15% - आरक्षण 15%

50% तील उर्वरित आरक्षण OBC साठी


🎯 आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे सामाजिक न्यायमंत्री मा. राजेंद्र पाल गौतम जी यांनी निर्धार केलं आहे की , 2025 पर्यंत 10 करोड लोकांना बौद्ध धर्माची दीक्षा देण्याचा . पण वास्तविक पाहाता त्यांनी अनुसूचित जाती (SC) तील लोकांना जनगणनेत जातीच्या कॉलम मध्ये (SC) तील जात आणि धर्माचा कॉलम मध्ये हिंदु ऐवजी बौद्ध धर्म नोंदवावा यासाठी मोहीम चालवली पाहिजे . कारण की हा समाज सुरवाती पासूनच गौतम बुद्ध आणि बाबासाहेबांना मानणारा आहे . त्यांनी मिशन जय भीम या संस्थेच्या मदतीने मोबाईल नंबर पण जरी केला आहे . मो. नंबर *8800662528मिस कॉल दिल्यावर एक लिंक येईल त्यावर जाऊन आपल्याला वैयक्तिक माहिती भरून द्यायची आहे.*


🎯 SC आरक्षणाचे अ,ब,क,ड वर्गीकरण


महाराष्ट्रातील अनुसूचित जाती ( SC ) तील संख्याबळाने दुसऱ्या क्रमांकाचा समाज म्हणजे मातंग समाज . मातंग समाजाचे म्हणणे आहे की, SC च्या संपूर्ण नौकऱ्या महार (बौद्ध ) घेतात . आमच्या वाट्याला काहीच येत नाही . सुप्रीम कोर्ट ने राज्यांना आरक्षण वर्गीकरण करण्याचे अधिकार आहेत असे म्हटले आहे . लोकसंख्येनुसार SC तील आरक्षणाचे अ,ब,क,ड वर्गीकरण करावे अशी मागणी मातंग समाजाची आहे  .


🎯 फक्त 10 टक्के उन्नती


महाराष्ट्रातील अनुसूचित जाती ( SC ) तील लोकांची परिस्थिती पाहिली तर असे दिसते की ,  10 % लोकांचा विकास झाला . ते पण सरकारी नौकरी मिळाल्यामुळे . 90 टक्के समाज आताही गरीब , वंचित , उपेक्षित समाज आहे . याचा विकास कसा होईल यावर आपल्याला भर द्यायला हवाय . काही जणांची प्रगती झाली म्हणजे संपूर्ण समाजाची प्रगती होत नाही .आरक्षणाने फक्त 10% लोकांचा च कल्याण होऊ शकतो . कारण की , आरक्षण हे सरकारी नौकरीत आहे . आणि सरकारी नौकरी ह्या मर्यादित संख्येच्या असतात .


संविधानाने अनुसूचित जाती (SC) ,जमाती (ST) , इतर मागासवर्गीय (OBC) तील जातीचा प्रवर्गांना आरक्षण दिलेत . कोणत्या विशिष्ट धर्माला नाही .


समाजात अभ्यासू लोकांची संख्या घटून राहिली . आणि मूर्खांची संख्या वाढत असताना दिसून येते . काहीपण पोस्ट पसरवतात . फॉरवर्ड करताना ते बरोबर की चुकीचे हे पण पाहत नाही . दुसऱ्यांना अंध भक्त म्हणणारे स्वतः किती महामुर्ख आहेत याचा अंदाज लावावा .


शेवटी आगामी जनगणनेत आपल्या हक्कच्या आरक्षणावार हातोडा न मारता , अनुसूचित जातीतील (SC) तिल लोकांनी जातीच्या कॉलम मध्ये (SC) तील जात आणि धर्माच्या कॉलम मध्ये बौद्ध धर्माची नोंद करावी . हीच इच्छा .


जय भीम   नमो बुद्धाय

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area