अब्दुललाट (ता शिरोळ)येथील अब्दुल लाट शिवसेना शहर महिला आघाडीच्या अध्यक्षपदी सौ मीनाक्षी अभिजीत मुळे तर युवा सेना शहराध्यक्ष श्री प्रदीप सुरेश कोळी यांची निवड करण्यात आली. (local politics news)
या निवडीचे अध्यक्षस्थानी शिवसेना जिल्हाध्यक्ष माननीय श्री मुरलीधर जाधव यांनी या निवडी केल्या हा कार्यक्रम मातोश्री मेडिकल सर्विस अब्दुलालाट येथे पार पडला गावात शिवसैनिक व शिवसेना वाढीसाठी व संघटन करण्यासाठी संपर्क मेळाव्यात घेण्यात आला. (local politics news)
यावेळी मीनाक्षी मुळे यांचा सत्कार मंगल चव्हाण यांनी केला तर प्रदीप कोळी यांचा सत्कार जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी केला. त्यावेळी तालुका अध्यक्ष वैभव ऊगळे, माजी आमदार उल्हास पाटील, मधुकर पाटील, मंगल चव्हाण, माधुरी टाकारे, रेखा जाधव, संजय घोरपडे, चंद्रकांत मोरे, संजय परीट,महावीर गाडवे, सुरेश कोळी, डॉक्टर वृषभ चौगुले, डॉक्टर राजू बैरागी, शिवदीप कोळी व शिवसैनिक उपस्थित होते.