औरंगाबादेत विवाहित युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

कन्नड: शहरातील पांडव नगरी येथील अमित सुभाष तारू (वय ३५) या विवाहित युवकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. सकाळी नऊ वाजेच्या सुमारास अमित तारू हा दरवाज़ा उघडत नसल्याचे कुटुंबातील सदस्यांच्या लक्षात आले. दरवाजा उघडून पाहिले असता असता त्याने आत्महत्या केल्याचे दिसून आले. नातेवाइकानी तातडीने त्याला कन्नड ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले, तेथील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. याबाबत कन्नड शहर पोलिस ठाण्यास घटनेची माहिती दिली. या बाबत कन्नड शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक रामेश्वर रेंगे यांचा मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार एस. के तायडे पुढील तपास करीत आहेत.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area