औरंगाबाद : कत्तलीसाठी आणली ११ जनावरांची तस्करी; एकाला अटक

 

औरंगाबाद : कत्तलीसाठी ट्रकमधून ११ जनावरे आणणाऱ्या एकाला पोलिसांनी पाठलाग करून पकडले; तर त्याचा साथीदार पळून गेला. ही कारवाई शनिवारी (१७ जुलै) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास सिल्लेखाना परिसरात करण्यात आली. त्याच्याकडून क्रांती चौक पोलिसांनी कत्तलीसाठी आणलेली ११ जनावरे व एक ट्रक असा एकूण ४ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईनंतर सिल्लेखान्यात काही काळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फैसल खान फेरोज खान (२९, रा. इंदिरानगर, बायजीपुरा) असे पोलिसांच्या ताब्यात असलेल्या ट्रकचालकाचे नाव आहे. तर मुजाहेद खान नासेर खान(रा. सिल्लेखाना) असे पळून गेलेल्या युवकाचे नाव आहे. पोलिस निरीक्षक डॉ. गणपत दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक राहुल सुर्यतळ, उपनिरीक्षक गजानन सोनटक्के, सोनवणे,

जमादार वानखेडे, गायकवाड, पुरी, खोगरे, हनुमंत चाळणेवाड यांच्या पथकाने केली. जनावरांची वाहतूक करणाऱ्या विरूध्द क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area