औरंगाबाद : कंपनीत उभ्या केलेल्या पोकलेनच्या पार्टची चोरी; गुन्हा दाखल

 

औरंगाबाद : वाळूज  एमआयडीसीतील एका कंपनीत उभ्या केलेल्या पोकलेनचे अडीच लाख रुपयांचे पार्ट चालकानेच चोरल्याची घटना मंगळवारी (२० जुलै) उघडकीस आली. या प्रकरणी पोकलेनचे मालक सुधाकर गायकवाड यांच्या फिर्यादीवरून वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुधाकर गायकवाड यांच्या मालकीचे पोकलेन येथील एका कंपनीत खोदकामासाठी आणले होते. दिवसभर काम करून मशिन संध्याकाळी कंपनीतच उभे केले होते. मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास गायकवाड यांनी कंपनीत जाऊन पहिले असता पोकलेनचे चार वॉल दिसून आले नाही; तसेच पोकलेन चालक पिंटु पंडीत (वय २३) आणि व अनिल कुमार (दोघे रा. चंडवाड, झारखंड) दिसले नाहीत. त्यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता ते बंद आले. त्यामुळे पोकलेनचे पार्ट त्यांनीच चोरी केले असावे असा संशय पोकलेनचे मालक गायकवाड यांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलिस अंमलदार गायकवाड करत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area