विशेष पथकाने केली अल्पवयीन मुलीची सुटका

 

औरंगाबाद : अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची घटनेची माहिती मिळाल्यानंतर, एएचटीसीयू (अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष) विशेष पथकाने प्रेमीयुगलाचा पाठलाग करून अल्पवयीन मुलीची सुटका केली. तसेच, या मुलीला पळवून नेणाऱ्या अक्षय साहेबराव पवार (२२) याला विशेष पथकाने एमआयडीसी वाळूज पोलिसांच्या हवाली केले. एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्याअंतर्गत एक अल्पवयीन मुलीला पळविल्याची घटना नोंदविण्यात आली होती.गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीवरून, दोघांनाही ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई पोलिस आयुक्त डॉ. निखील गुप्ता, उपायुक्त मिना मकवाना यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पोलिस उपनिरिक्षक स्नेहा करेवाड, महिला पोलिस अंमलदार हिरा चिंचोलकर, मोहिनी चिंचोळकर, पोलिस अंमलदार ईश्वरसिंग कहाटे, साबळे, गणेश पंडुरे यांनी ही कारवाई यशस्वी केली.Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area