मी शिवसेनेत राहू नये, असं अनेकांना वाटतंय, शिवसेनेच्या आमदाराचा मंत्र्यावर गंभीर आरोप
जळगाव: पालकमंत्री गुलाबराव पाटील हे मला त्रास देत असल्याचा खळबळजनक आरोप शिवसेनेचे आमदार चिमणराव पाटील यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपामुळे जळगावमधील शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. चिमणराव पाटील हे पारोळ्याचे आमदार आहेत. मी ज्येष्ठ आमदार असून स्थानिक पातळीवर माझे मत विचारात घेतले जात नाही. गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्याकडून मला डावलले जाते, ही वस्तुस्थिती आहे, असे चिमणराव पाटील यांनी म्हटले त्यामुळे आता जळगावात शिवसेनेचा मंत्री विरुद्ध आमदार, असा सामना रंगण्याची शक्यता आहे. (Shivsena MLA Chimanrao Patil take a dig at jalgaon guardian minister Gulabrao Patil)

‘भाजपात दोन डझन आमदार राष्ट्रवादीचे; शिवसेनेतही बाहेरचे, आमच्यासारखे एकनिष्ठ थोडेच’

काही दिवसांपूर्वी गुलाबराव पाटील यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले होते. सर्वच पक्षात बाहेरचे लोक घुसखोरी करुन आमदार झाले आहेत. भाजपमध्ये तब्बल दोन डझन आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. शिवसेना, राष्ट्रवादीतही बाहेरचे लोक आमदार आहेत, आमच्यासारखे काही थोडेच एकाच पक्षाचे एकनिष्ठ आहेत, असं गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी म्हटले होते. भाजप खासदार रक्षा खडसे (Raksha Khadse)आणि भाजप जळगाव जिल्हाध्यक्ष आमदार राजू मामा भोळे यावेळी उपस्थित होते.

कोणीही ठामपणे सांगू शकत नाही हा माझा पक्ष आहे. सर्वच पक्षात बाहेरचे लोक घुसखोरी करुन आमदार झाले आहेत. त्यामुळे आगामी काळात राजकीय वाद बाजूला ठेवून सर्वांनी विकासासाठी एक होण्याची गरज आहे” असे मत गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले. भालोद येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने शेतकऱ्यांच्या धान्यासाठी चाळण आणि प्रतवारी यंत्रणा उभारली आहे. या प्रकल्पाला माजी खासदार हरिभाऊ जावळे यांचे नाव देण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झाले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area