murder in Bhusawal: भुसावळ शहरात अज्ञात तरुणाचा निर्घृण खून; दगडाने ठेचला चेहरा

 

जळगाव : जिल्ह्यातील भुसावळ शहरातील जामनेर रस्त्यावरील श्रद्धा कॉलनीत असलेल्या गजानन महाराज मंदिराजवळ काल गुरुवारी)रात्री एका अज्ञात तरुणाचा निर्घृणपणे खून झाला आहे. आज शुक्रवारी सकाळी ही घटना उजेडात आल्यानंतर एकच खळबळ उडाली. मारेकऱ्यांनी तरुणाच्या अंगावर चाकूने वार केले आहेत. त्यानंतर मृताचा चेहरा दगडाने ठेचून विद्रुप केला आहे. (brutal murder of an unknown youth in bhusawal city)

श्रद्धा कॉलनीतील गजानन महाराज मंदिरात शुक्रवारी सकाळी काही नागरिक दररोजप्रमाणे दर्शनासाठी आले. त्यावेळी अज्ञात तरुण रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत पडलेला असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. मृतदेहाची स्थिती पाहून हा खुनाचा प्रकार असल्याचे स्पष्ट होत असल्याने, या घटनेची माहिती तत्काळ पोलिसांना देण्यात आली.

खून झालेल्या तरुण हा ३२ ते ३५वयोगटातील आहे. मारेकऱ्यांनी त्याच्या अंगावर चाकूने वार केलेले असून, चेहरा दगडाने ठेचून विद्रुप केला आहे. त्यामुळे मृत तरुणाची ओळख पटवण्यात अडचणी येत आहेत. पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिसरातील नागरिकांचे जाबजबाब नोंदवून घेतले. खून झालेल्या तरुणाची ओळख अस्पष्ट आहे. मृताची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. तरुणाचा चेहरा दगडाने ठेचल्याने ओळख पटवण्यात अडचणी येत आहेत. पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडला असावा, असा प्राथमिक अंदाज उपविभागीय पोलीस अधिकारी वाघचौरे यांनी यावेळी वर्तवला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area