वर्धा : अल्पवयीन मुलांना घरात ठेवले कोंडून; कंत्राटदारांच्या तावडीतू मुलांची सुटका

 

वर्धा : झारखंड राज्यातील ११ अल्पवयीन मुलांना घरात कोंडून त्यांना उपाशी ठेवण्याचा प्रकार कंत्राटदारांकडून घडल्याचा प्रकार वर्धा जिल्ह्यात समोर आला आहे. बोरीबारा येथील पाइप बनविणाऱ्या कंपनीमध्ये हे ही मुले काम करीत होती. बाल संरक्षण कक्षाने पोलिसांच्या मदतीने या मुलांची कंत्राटदारांच्या तावडीतून सुटका केली.
रसुलाबादनजीकच्या बोरीबारा परिसरात रस्त्याच्या कामावर काही अल्पवयीन मुले असल्याची माहिती बाल संरक्षण कक्षाला मिळाली होती. झारखंडमधून कंत्राटदारांनी ही अल्पवयीन मुले आणली होती. जितू व कार्तिक नावाच्या कंत्राटदारांनी त्यांना कोंडून ठेवले होते. त्यांना जेवण दिले आणि पगारदेखील दिला जात नाही, अशी तक्रार नागपूर येथील 'डीसीपीओ'कडे आली होती. ती वर्ध्याच्या बाल संरक्षण कक्षाकडे पाठविण्यात आली. बाल संरक्षण कक्षाने यात पुलगाव पोलिसांच्या मदतीने मुलांची सुटका केली. सर्व मुलांची प्रकृती ठीक असून, ती सुरक्षित आहेत.Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area