Aurangabad Corona Vaccination | औरंगाबादेत लसीकरण पूर्णत: बंद, लससाठा उपलब्ध झाला तरच सोमवारचे नियोजन

 

औरंगाबाद : कोरोना विषाणूचे डेल्टा प्रारुप आणि संभाव्य तिसरी लाट बघता राज्य सरकारने लसीकरण मोहीम युद्धपातळीवर राबवण्याचे ठरवलेले आहे. मात्र, लसीच्या तुटवड्यामुळे या मोहिमेदरम्यान मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. औरंगाबाद शहरातसुद्धा कोठेही लस उपलब्ध नसल्यामुळे आज (16 जुलै) लसीकरण बंद ठेवण्यात आले आहे. लससाठा उपलब्ध नसल्यामुळे हा निर्णय घेण्यात आलाय. (corona vaccination is been stopped due to shortage of corona vaccine in aurangabad)
लसी मिळाल्या तर उद्यासाठी लसीकरणाचे नियोजन

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेशी मुकाबला करायचा असेल तर मोठ्या संख्येने लोकांचे लसीकरण करणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मात्र, केंद्र सरकारकडून पुरेशा प्रमाणात लस मिळत नसल्यामुळे अनेक ठिकाणी लसीकरण मोहिमेत बाधा येत आहे. औरंगाबाद शहरातसुद्धा अशीच परिस्थिती आहे. औरंगाबाद शहरात सध्या लससाठा उपलब्ध नसल्यामुळे लसीकरण पूर्णत: बंद ठेवण्यात आले आहे. आज लसी मिळाल्या तर उद्यासाठी (19 जुलै) लसीकरणाचे नियोजन करण्यात येणार आहे. तशी माहिती प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.300 टोकन वाटले तरी लोकांची गर्दी

लसीकरणासाठी औरंगाबादेत ठिकठिकाणी लसीकरण केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. बजाजनगरमधील मोहटादेवी परिसरातसुद्धा एक लसीकरण केंद्र उभारण्यात आले आहे. मात्र, येथे 15 जुलै रोजी लसीसाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. लोकांची गर्दी वाढल्यामुळे येथील आरोग्य कर्मचाऱ्यांनी नागरिकांना 300 टोकन वाटले होते. मात्र, तरीसुद्धा उरलेल्या नागरिकांचा केंद्रावर गोंधळ सुरूच होता. या सर्व प्रकारामुळे आरोग्य कर्मचारी काही काळासाठी गोंधळून गेले होते. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. यापूर्वीसुद्धा या लसीकरण केंद्रावर अशाच प्रकारे गोंधळ उडाला होता. त्यावेळी येथे थेट पोलिसांना पाचारण करावे लागले होते.

दरम्यान, मुबलक प्रमाणात लसींचा साठा नसल्यामुळे औरंगाबादेत उपलब्ध लसीकरण केंद्रांवर नागरिक मोठ्या प्रमाणावर गर्दी करत आहेत. विविध लसीकरण केंद्रांवरील गोंधळ तसेच नागरिकांनी केकेली गर्दी यापूर्वीदेखील टीव्ही 9 मराठीने दाखवलेली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area