Video : मित्राच्या लग्नात डान्सच्या माध्यमातून लावली स्टेजवर आग! तरुणांनी ओढणी घेत केला जबरदस्त डान्स

 


मुंबई : सोशल मीडियावर सध्या लग्न समारंभातील व्हिडीओचा धुमाकूळ पाहायला मिळतोय. कधी नवरा-नवरीचे व्हिडिओ तर कधी लग्नात सहभागी मित्रमंडळींचा धकामेदार डान्स परफॉर्मन्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. लग्न समारंभातील असे व्हिडीओ तुम्ही हसून हसून लोटपोट होत असाल. लग्नात सहभागी झालेल्या मित्रांच्या डान्सचा असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. (Dance video of a youngsters at a friend’s wedding goes viral)

आपल्या एखाद्या मित्राचं लग्न असेल तर त्याच्या मित्रांची एक्साईटमेंड एकदम हाय लेव्हलवर असते. लग्नाची तारीख निश्चित होताच सर्व मित्र तयारी सुरु करतात. कपड्यांपासून डान्स परफॉरमन्सपर्यंत सगळं निश्चित केलं जातं. सर्व मित्र एकत्र लग्नात पोहोचतात. तिथं ते आपल्या मित्रासाठी खास डान्स सादर करतात. अशाच एका लग्नातील डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय.

काही मुलं स्टेजवर पांढरा शर्ट आणि काळ्या रंगाची पॅन्ट घालून स्टेजवर डान्स करताना एका व्हिडीओत पाहायला मिळत आहेत. त्या सर्वांनी आपल्या डोक्यावर ओढणी घेतलेली आहे. ही मुलं करन-अर्जुन चित्रपटातील प्रसिद्ध “मुझको राणा जी माफ करना” या गाण्यावर डान्स करत आहेत. त्यांचा डान्स परफॉरमन्स जोरदार आहे. या मुलांचे डान्स मूव्ह्स लोकांच्या पसंतीला उतरत आहेत.

इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ weddingmomentslove नावाच्या पेजवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत 28 हजारापेक्षा अधिक लोकांनी पाहिला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच धुमाकूळ घालतोय. लोक हा व्हिडीओ शेअरही करत आहेत. इतकंच नाही तर या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रियाही येत आहेत. हा व्हिडीओ लोकांसाठी मनोरंजन ठरत आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area