नागपुरात कारच्या टपावर बसून युवकांचा धुमाकूळ

 

नागपूर : होंडा सिटी कारच्या (एमएच ३१ सीएस १२२०) टपावर बसून धुमाकूळ घालणाऱ्या युवकांना वाहतूक शाखा पोलिसांनी पकडून लकडगंज पोलिसांच्या स्वाधीन केले.


प्रजापती चौकात १६ जुलै रोजी सायंकाळी काही युवक कारच्या टपावर बसून धुमाकूळ घालत असल्याचे छायाचित्र वाहतूक शाखा पोलिसांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर एका नागरिकाने पोस्ट केले. वाहतूक शाखेचे उपायुक्त सारंग आव्हाड यांनी याची गंभीर दखल घेत युवकांविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देश लकडगंज वाहतूक शाखेला दिले. लकडगंज वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दीपक साखरे, सहाय्यक उपनिरीक्षक कृष्णा तिवारी, शत्रुघ्न कडू, हेडकॉन्स्टेबल सुभाष लांडे, नितीन पंडेल, जितेंद्र सहारे, विक्रम सिशोदे यांनी सीसीटीव्हीद्वारे कारचा क्रमांक मिळवून युवकांचा शोध सुरू केला. वाहतूक पोलिसांनी रियांश धुमराज रहांगडाले (वय २७, रा. देशपांडे ले-आऊट), हर्षल विनोद अबगड (वय २०, रा. आंबेडकर चौक, नंदनवन) व ऋषभ ऋषभ देवराव गणवीर (वय २७) या तिघांना ताब्यात घेतले. कारचालक शाहीद शेख (वय २७, रा. वाठोडा) हा फरार होण्यात यशस्वी झाला. वाहतूक शाखा पोलिसांनी युवकांना लकडगंज पोलिसांच्या स्वाधीन केले. लकडगंज पोलिसांनी युवकांविरुद्ध मोटार वाहन कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area