मुंबई : भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने (MS Dhoni) 15 ऑगस्ट 2019 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीला ब्रेक देण्याचा निर्णय घेतला. टी 20 वर्ल्ड कप, एकदिवसीय वर्ल्डकप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणारा तो क्रिकेटच्या दुनियेतील पहिला कर्णधार ठरला. तो खेळत असतानाच त्याच्यावर बायोपिक आला होता. क्रिकेटला राम राम ठोकल्यानंतर धोनी शेती मातीत व्यस्त आहे. निवृत्तीनंतर आपल्या फार्महाऊवर तो अनेक प्रकारची कामं करताना दिसून येतो. त्याचे काम करतानाचे अनेक फोटोही सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत. हे झालं धोनीच्या निवृत्ती नंतरच्या आयुष्याचं… पण एक खेळाडू अशी आहे की जिच्या निवृत्तीनंतरच्या आयुष्याची चर्चा आजही जगभर होते. आज त्याच महिला खेळाडूची जयंती आहे. आपण पाहूयात तिची भारतीयांना माहिती नसलेली जगावेगळी कहाणी….
आज इंग्लंड महिला क्रिकेट टीमची स्टार विकेटकीपर बेट्टी स्नोबॉलचा (Betty snowball) वाढदिवस आहे. 1930 पासून दोन दशकांपर्यंत तिचा महिला क्रिकेटमध्ये प्रभाव पाहायला मिळाला. तिच्या पिढीची सर्वोत्कृष्ट सलामीवीर आणि उत्कृष्ट यष्टीरक्षक स्नोबॉलने आंतरराष्ट्रीय स्तरावर स्क्वॅशदेखील खेळली. इंग्लंडकडून 10 कसोटी सामने खेळणार्या बेट्टी स्नोबॉलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप दिल्यानंतर एका शाळेत क्रिकेट आणि गणिताचे धडे द्यायला सुरु केलं. 13 डिसेंबर 1988 रोजी वयाच्या 80 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
निवृत्तीनंतरच्या आयुष्यात तिने तरुण मुलींना क्रिकेटचे धडे दिले. आपल्या संघाला अधिकाधिक चांगल्या महिला खेळाडू मिळाव्या, यासाठी तिने निवृत्तीनंतरचं आयुष्य खर्ची घातलं.
कसोटी क्रिकेटमध्ये 1 शतक आणि 4 अर्धशतक
बेटी स्नोबॉलने तिच्या कारकिर्दीत इंग्लंडकडून दहा कसोटी सामने खेळले. यात तिने 40.86 च्या सरासरीने फलंदाजी केली. या सामन्यांमध्ये स्नोबॉलने एकूण 18 डावात तीन वेळा नाबाद राहून एकूण 613 धावा केल्या. या दरम्यान 189 हा तिचा सर्वोच्च स्कोअर होता. कसोटी क्रिकेटमध्ये स्नोबॉलने एक शतकही साजरं केलं. यादरम्यान तिच्या बॅटमधून चार अर्धशतकेही आली.