fake ias santosh verma : बनावट स्वाक्षरीने IAS झाला, प्रेयसिलाही फसवलं आणि आता...

 
इंदूर :  
मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये IAS अधिकारी संतोष वर्मा याला इंदूर पोलिसांनी अटक केली आहे. बनावट कगदपत्र तयार करून पदोन्नती घेतल्याचा आरोप आहे. आयएएस कॅडर अलॉट झाल्यावर संतोष वर्माने DPC (डिपार्टमेंटल प्रमोशन कमिटी) साठी विशेष न्यायाधीश ( CBI आणि व्यापमं ) यांची बनावट स्वाक्षरी करून अहवाल तयार केला होता. बनावट IAS अधिकारी संतोष वर्मा हा भोपाळमध्ये नागर प्रशासन विभागात नियुक्तीवर होता. लग्नाचं आमिष दाखवून आपल्यावर बळजबरी केल्याचा आरोप संतोष वर्मा याच्यावर यापूर्वी एका महिलेने केला होता.

IAS वर्मा याला रविवारी रात्री एमजी रोज पोलिसांनी अटक केली होती. अटक झाल्यानंतर वर्मा याला मंगळवारी रात्री पदावरून निलंबित करण्यात आलं आहे. त्याला आज दुपारी जिल्हा कोर्टात हजर करण्यात आलं. कोर्टाने त्याला १७ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. ६ ऑक्टोबर २०२० ला ज्या न्यायाधीशांनी निकाल दिल्याचं त्याने बनावट कागदपत्रांमध्ये म्हटलं आहे त्या दिवशी न्यायाधीश सुट्टीवर होते. सर्टिफिकेट कॉपी ७ ऑक्टोबरला कोर्टाने निकाल जारी केला. संतोष वर्माने ८ ऑक्टोबरला निकालाची कॉपी भोपाळमध्ये सादर केली होती. खोट्या कागदपत्रांमुळे त्याचा भंडाफोड झाला.


बनावट आदेश बनवून IAS झालेल्या संतोष वर्माचे धक्कादायक कारनामे आता समोर आले आहेत. इंदूरमधील एका विमा एजंट तरुणीवर वर्माचं प्रेम जडलं. यानंतर दोघांच्या भेटी-गाठी सुरू झाल्या. त्यांनी लग्नही केलं. वर्मान लग्न केलं पण तिच्यासोबत राहण्यास टाळाटाळ करू लागला. यामुळे संतापलेल्या तरुणीने थेट इंदूरमधील लसुडिया पोलिस ठाणं गाठलं आणि वर्माविरोधात तक्रार दाकल केली होती. २०१६ ला तिने ही तक्रार केली होती. लग्नानंतर आपल्याला फसवल्याचा आरोप तिने केला होता. वर्माने आपल्याला लिव इनमध्ये ठेवलं, असं तिने म्हटलं होतं.


आरोपी वर्मान ४ महिन्यांपूर्वी त्याच पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. एक महिला आपल्याला ब्लॅकमेल करत आहे. पती म्हणून आपलं नाव सांगत आहे. पासपोर्ट आणि मतदान ओळखपत्रावरील माझं नाव लिहितेय, असा आरोप वर्माने तक्रारीत केला होता.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area