मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेने गरीबांच्या शिक्षणासाठी भरीव योगदान द्यावे : छगन भुजबळ

नाशिक : येथील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, नाशिकचे शरदचंद्रजी पवार कॉलेज ऑफ आर्किटेक्चर नामकरण, राजर्षी शाहू महाराज पॉलिटेक्निक कॉलेजच्या नवीन इमारतीचं उद्घाटन आणि उदाजी महाराज शैक्षणिक वारसा संग्रहालय लोकार्पण सोहळा आज पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) उपस्थित होते. (future of MVP is bright, they should make significant contribution for education of poor: Chhagan Bhujbal)

मराठा विद्या प्रसारक समाज शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून सत्यशोधक चळवळीचं काम केल जात आहे. ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ हे ब्रीद वाक्य घेऊन मविप्र ही संस्था गेल्या 107 वर्षापासून समाजाला आपली सेवा देत आहे. सत्यशोधक विचारसरणीवर काम करून बहुजन समाजाची सेवा करावी. अतिशय सुंदर आणि प्रेक्षणीय असे संग्रहालय निर्माण करण्यात आलेले आहे. संस्था अधिकाधिक उज्वल कशी होईल, गरिबांना शिक्षण कसे मिळेल यासाठी प्रयत्न करावे, अशी अपेक्षा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच कोरोनाच्या काळात अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी आपले प्रयत्न सुरू असून लवकरच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या माध्यमातून आरोग्य सेवेसाठी मदत होईल, असेही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

मराठा विद्या प्रसारक समाज शैक्षणिक संस्थेला शतकांचा इतिहास असून अनेक कर्मवीरांचे संस्थेच्या जडण घडणीत महत्वाचे योगदान आहे. त्यामुळे या संस्थेच्या रचलेल्या पायाला अधिक भक्कपणे पुढे नेण्यासाठी संस्थेमार्फत सुरु करण्यात आलेल्या आर्किटेक्चर व पॉलिटेक्निकल महाविद्यालयात आधुनिक काळाची आणि उद्योगांची गरज लक्षात घेत आधुनिक शिक्षण पध्दतीची कास धरावी, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

पालकमंत्री या नात्याने छगन भुजबळ यांच्या माध्यमातून अनेक विकासाची कामे नाशिकमध्ये झाली आहेत. त्यामुळे मुंबई आणि पुण्यानंतर आता नाशिक शहर पुढे येत आहे. विकासाचा हा वेग कायम राहण्यासाठी नागरिकांना दळणवळणाच्या अधिक सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी नाशिक-पुणे रेल्वे मार्गासाठी निधीची भरीव तरतूद करण्यात येणार आहे. तसेच प्रस्तावित असलेल्या वैद्यकीय महाविद्यालय लवकर सुरु करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने सर्व नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन देखील यावेळी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. कार्यक्रमात यावेळी मविप्र संस्थेच्या सरचिटणीस निलीमाताई पवार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक तर कार्यक्रमाचे आभार संस्थेचे अध्यक्ष डॉ.तुषार शेवाळे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area