गोकुळची सत्ता हाती येताच दूध उत्पादकांसाठी भेट, हसन मुश्रीफ-सतेज पाटलांचं ‘ठरलंय’!

 


कोल्हापूर : गोकुळची सत्ता हाती येताच ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील यांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलेलं आश्वासन लवकरच पूर्ण होणार आहे. गोकुळच्या दूध उत्पादकांना गोकुळ दूध संघाकडून दोन रुपये दरवाढीची भेट मिळण्याची शक्यता आहे. हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील दूध दरवाढीची घोषणा करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीवेळी दिलं होतं दरवाढीच आश्वासन देण्यात आलं होतं. 

सत्ता येताच आश्वासन पूर्तीसाठी नेत्यांचे प्रयत्न

गोळुळ दूध संघाची निवडणूक जिकंल्यानंतर पालकमंत्री सतेज पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला होता. त्यावेळी दूध उत्पादकांनी चांगलं यश दिलं. मनापासून डोकं ठेवून दूध उत्पादकांचे आभार मानतो. हा दूध संघ मल्टिस्टेटच्या माध्यमातून कोण्याच्या घशात जाऊ नये, ही आमची भावना आहे. निवडणूक आता संपलीये, काल कोणी काय केलं यावरून आम्ही निवडणूक आलोय. आता आमचा नवा अजेंडा असणार आहे. मुंबईत गोकुळचा दबदबा वाढवणार आहोत. शेतकऱ्यांना 2 रुपये दर वाढवून देणार आहोत, असं आश्वासनं सतेज पाटील यांनी गोकुळच्या विजयानंतर दिलं होतं. पाटील यांनी त्यावेळी दूधदर वाढीसाठी थोडा वेळ मागून घेतला होता. “आमच्या शब्दात आम्ही कोठेही मागे पडणार नाही. गोकुळ दूध संघात प्रस्थापित व्यवस्था आहे. त्यातल्या उणिवा दूर करायच्या आहेत. आम्हाला थोडा वेळ द्या,” असे निवडणूक जिंकल्यानंतर सतेज पाटील म्हणाले होते.

सध्या दर किती?

गोकुळ दूध संघ शेतकऱ्यांना सध्या म्हशीच्या दुधाला आहे 39 रुपये तर गाईच्या दुधासाठी 26 रुपये दर देत आहे. यादरामध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांना आणखी दोन रुपये वाढवून देण्यात येणार आहेत.

मुंबईत गोकुळचं दूध महागणार?

गोकुळ दूध संघाकडून शेतकऱ्यांना दूध खरेदी दरात दोन रुपये वाढवून देण्यात येणार असले तरी लगेचच सर्वत्र दूध विक्रीच्या दरात वाढ होणार नसल्याची माहिती आहे. मुंबई शहरात मात्र दूध विक्री दरात वाढीबाबत चाचपणी करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

गोकुळ निवडणूक

गेल्या महिन्यात झालेल्या गोकुळ दूधसंघाच्या निवडणुकीत अखेर सत्तांतर झालं. गोकुळ दूध संघावर सतेज पाटील-हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या राजर्षी शाहू परिवर्तन आघाडीने विजय मिळवला. गोकुळ दूधसंघातील महादवेराव महाडिक (Mahadevrao Mahadik) आणि आमदार पी एन पाटील गटाच्या तब्बल तीन दशकांच्या सत्तेला सतेज पाटील गटाने शेवटी सुरुंग लावला. गोकुळ दूध संघाच्या 21 पैकी 17 जागा या काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या आघाडीला मिळाल्या. सत्ताधारी महादेवराव महाडिक गटाला केवळ चार जागांवर समाधान मानावं लागलं.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area