Gold Silver price today: सोने-चांदीच्या भावात मोठी घसरण; गुंतवणुकदारांसाठी सुवर्णसंधी

 


Gold Silver rate today: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मल्टी कमोडिटी एक्स्चेंजमध्ये (MCX) सोने आणि चांदीच्या भावात मोठी घसरण झालेला पाहायला मिळत आहे. सोन्याच्या दरात (Gold Rates) 219 रुपयांची घसरण होऊन प्रतितोळा भाव 47704 रुपये इतका झाला आहे. तर चांदीच्या दरात 331 रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे चांदीचा प्रतिकिलो दर 68966 रुपये इतका झाला आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या दरात 6.80 डॉलर्सची घसरण झाली असून ते 1803.95 डॉलर्स प्रतिऔंस या पातळीवर पोहोचले आहे.

तर दुसरीकडे भांडवली बाजारात मात्र सकाळपासून तेजीचे वातावरण आहे. सकाळच्या सत्रात बाजार उघडल्यानंतर सेन्सेक्सने 291 अंकांची उसळी घेत 52678 ची पातळी गाठली. तर निफ्टीही 91 अंकांनी वधारला. निफ्टी सध्या 15781च्या पातळीवर आहे. अल्ट्राट्रेक, मारुती, आयसीआयसीआय बँक, एसबीआय आणि एक्सिस बँकेच्या समभागाचा भाव आज वधारला. तर भारती एअरटेल, बजाज फायनान्शियल, एचडीएएफसी बँक आणि हिंदुस्थान युनिलिव्हरच्या समभागाच्या किंमतीत घसरण पाहायला मिळाली.

सोनं स्वस्तात खरेदी करण्याची संधी

Sovereign Gold Bond Scheme चे सबस्क्रिप्शन सोमवारपासून ग्राहकांसाठी खुले होणार आहे. हे बाँडस सोन्यातील गुंतवणुकीचा अत्यंत सुरक्षित पर्याय मानला जातो. अगदी एक ग्रॅमपासूनही या बाँडसमध्ये गुंतवणूक करता येते. प्रत्यक्षात घरातील तिजोरी किंवा बँकेच्या लॉकरमध्ये सोने (Gold) ठेवण्याची जोखीम पत्कारण्यापेक्षा सॉवरेन गोल्ड बॉन्ड हा तुलनेत सुरक्षित पर्याय समजला जातो.

रिझर्व्ह बँकेने या सिरीजसाठी प्रतिग्रॅम इश्यू प्राईस 4,807 रुपये इतकी निश्चित केली आहे. सॉवरेन गोल्ड बॉन्डमध्ये ऑनलाईन गुंतवणूक केल्यास तुम्हाला प्रतिग्रॅम सोन्यापाठी 50 रुपयांची सूट मिळेल. ऑनलाईन खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी गोल्‍ड बॉन्‍डचा भाव प्रतिग्रॅम 4757 इतका आहे. सध्या सोने-चांदीचा दर हा सामान्यांच्या आवाक्यापलीकडे गेला आहे. त्यामुळे सोने खरेदीचे (Gold) नाव काढले की अनेकांच्या पोटात गोळा येतो. मात्र, आता एका सरकारी योजनेच्या माध्यमातून सोनं स्वस्तात खरेदी करण्याची संधी चालून आली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area