Gold Hallmarking च्या नियमांविषयी संभ्रमाचे वातावरण, व्यापारी नाराज

 


मुंबई: केंद्र सरकारकडून लागू करण्यात आलेल्या Gold Hallmarking च्या नियमांच्या स्पष्टतेविषयी आता व्यापारी वर्गाकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. केंद्र सरकारने 16 जूनपासून देशभरात सोन्याच्या दागिन्यांसाठी हॉलमार्किंगचा नियम बंधनकारक केला होता. त्यानुसार आता सोन्याची विक्री करताना त्यावर हॉलमार्क असणे बंधनकारक आहे. मात्र, या सगळ्याविषयी ग्राहक आणि व्यापाऱ्यांमध्येही पुरेशी स्पष्टता नसल्याचे समोर आले आहे. (Confusion over new rule of Gold Hallmarking)

ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक काऊन्सिलने (GJC) याविषयी सरकारला माहिती दिली आहे. Gold Hallmarking नव्या नियमांविषयी व्यापाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण असल्याचे त्यांनी म्हटले आहे. भारतीय मानक ब्युरो (BIS) च्या संकेतस्थळावर किंवा इंटरनेटवर सर्वाधिक विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांमधून FAQ या बदलांची तितकीशी माहिती मिळत नाही, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे आता केंद्र सरकार यावर काय तोडगा काढणार, याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

‘हॉलमार्किंगच्या दागिन्यांसाठी ग्राहकांना ऑगस्ट महिन्यापर्यंत वाट पाहावी लागणार’

केंद्र सरकारने 16 जूनपासून देशभरात हॉलमार्क असलेल्याच सोन्याच्या दागिन्यांची विक्री केली जाईल, हा नियम लागू केला होता. मात्र, या नियमाची अंमलबजावणी सुरु झाल्यानंतर ग्राहक अजूनही हॉलमार्क (Gold Hallmarking) असलेल्या दागिन्यांच्या प्रतीक्षेत आहेत. राज्यातील मोठ्या जिल्ह्यांमधील सर्व सराफी पेढ्यांमध्ये फक्त सोन्याची शुद्धता प्रमाणित केलेले (हॉलमार्क) दागिने उपलब्ध होण्यासाठी अजून किमान दीड महिन्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

केंद्र सरकारने नोटांबदी आणि जीएसटीप्रमाणेच या निर्णयाची घाईघाईने अंमलबजावणी केल्याचे चित्र दिसत आहे. कारण, नियम लागू होऊन 12 दिवस उलटल्यानंतरही नोंदणी प्रणालीत बरेच बदल बाकी आहेत. त्यामुळे आता Gold Hallmarking ची अंमलबजावणी ऑगस्ट महिन्यापर्यंत लांबणीवर पडली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area