नवविवाहितेला अॅसिड पाजलं, महिन्याभरानंतर आरोपी पतीला अटक

 


ग्वालियर :
मध्य प्रदेशात अनेकांना हादरवून टाकणारी एक घडना उघडकीस आलीय. ग्वालियरमध्ये एका नवविवाहीत तरुणीला सासरच्या मंडळींनी अॅसिड पाजल्याचं समोर आलंय.धक्कादायक म्हणजे, २८ जून रोजी ही घटना घडली होती. मात्र, यावर पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नव्हती. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालीवाल यांनी या संदर्भात सोशल मीडियावर याविरोधात आवाज उंचावला. त्यानंतर ग्वालियर पोलिसांनी एका आरोपीला अटक केलीय.आईनं केली होती तक्रार

पीडित महिलेचा विवाह याच वर्षी झाला होता. ३ जुलै रोजी पीडितेच्या आईनं डबरा पोलीस स्टेशनमध्ये हुंड्यासाठी मुलीचा छळ केला जात असल्याचं तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पीडितेच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तसंच पीडितेला उपचारासाठी दिल्लीला धाडण्यात आलं.
दंडाधिकाऱ्यांसमोर जबाब नोंदवताना पीडितेनं, आपल्याला पती, त्याची वहिनी तसंच ननंदेनं अॅसिड पाजल्याचं सांगितलं. अॅसिड शरीरात गेल्यानं पीडितेचं शरीर आणि पोटातील आतडी जळाली आहेत. तिची प्रकृती चिंताजनक आहे.

स्वाती मालिवाल यांनी ट्विटमध्ये मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडे पोलीस आरोपींविरुद्ध कारवाई करत नसल्याची तक्रार केली होती. निष्काळजीपणे एफआयआर दाखल करण्यात आल्यानं या प्रकरणात अद्याप कुणालाही अटक झाली नसल्याचंही स्वाती मालिवाल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं. सोबतच त्यांनी या मुलीच्या जळालेल्या अवयवांचा एक फोटोही शेअर केला.

हे ट्विट मीडियासमोर आल्यानंतर प्रकरणात पोलिसांनी कारवाई करत हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करत आरोपी पतीला अटक केली. इतर आरोपींनाही लवकरच अटक करण्यात येईल, असंही पोलिसांनी म्हटलंय.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area