कोल्हापूर जिल्ह्यात संततधार अनेक बंधारे पाण्याखाली


कोल्हापूर :  जिल्ह्यात संततधार पाऊस पडअसून अनेक बंधारे पाण्याखाली गेली आहेत. गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात पाऊस सर्वदूर कोसळत आहे. गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने दमदार पुनरागमन केले आहे. दोन दिवस सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत. धरणांच्या पाणी पातळीतही वेगाने वाढ होत आहे. 

अनेक जिल्हा तसेच राज्यमार्गावर पाणी आल्याने वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. राधानगरी धरण 62 टक्के, तुळशी धरण 61 टक्के तर काळम्मावाडी धरण 53 टक्के भरले आहे. भोगावती, तुळशी व दूधगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area