तिचा UPSC चा निकाल लागला, पेपरात फोटो आला पण पावसात बॉयफ्रेंडसोबत फिरतानाचा, पुढं त्या मुलीचं-मुलाचं नेमकं काय झालं?

मुंबई : सोशल मीडियावर रोज हजारो फोटो व्हायरल होतात. एखादा फोटो आवडला तर आपण त्याला लाईक करुन नंतर विसरूनही जातो. मात्र, व्हायरल होणारा फोटो हा फक्त लाईक करण्यापूरता नसून त्या फोटोमागे एखादी मोठी कहाणीही लपलेली असू शकते. अशाच प्रकारच्या एका रोमँटिक फोटोमागची एक गोड कहाणी आयएएस अधिकारी चांदनी चंद्रन यांनी यावेळी सांगितली आहे. हा फोटो तसेच चांदनी चंद्रन यांची कहाणी सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरते आहे. (IAS officer Chandani Chandran shares her photos with boyfriend walking in rain)

प्रेमी युगुल भर पावसात फिरत होतं

सध्या व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये एक प्रेमी युगुल दिसत आहे. या फोटोमध्ये एक तरुण आपल्या प्रेयसीसोबत दिसतो आहे. पाऊस बरसत असल्यामळे हे दोघेही डोक्यावर छत्री घेऊन चालत आहेत. चारही बाजूने पाऊस सुरु असताना हे प्रेमी युगुल मजेत रस्त्याने फिरत आहे. हे प्रेमी युगुल दुसऱे तिसरे कोणी नसून खुद्द आयएएस ऑफिसर चांदनी चंद्रन आणि त्यांचे पती अरुण सुदर्शन हे आहेत. हा फोटो 2016 मधील आहे. 2015 साली चांदनी चंद्रन यांनी लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली होती. याच परीक्षेचा निकाल लागणार होता. निकालामुळे तणावात असल्यामुळे चंद्रन त्यांच्या तेव्हाचा प्रियकर आणि सध्याचे पती अरुण सुदर्शन यांच्यासोबत बाहेर फिरायला गेल्या होत्या.

परीक्षेत उनुत्तीर्ण पण फोटो वर्तमानपत्रात झळकला

मात्र, नंतर दुसऱ्या दिवशी या प्रेमी युगुलाचा म्हणजेच चांदनी चंद्रन आणि त्यांच्या प्रियकराचा फोटो थेट वर्तमानपत्रात छापून आला. ज्यावेळी चांदनी चंद्रन यांचा त्यांच्या प्रियकारासोबतचा फोटो वर्तमानपत्रात छापून आला, त्याआधी त्यांनी 2015 साली यूपीएससीची परीक्षा दिली होती. याच परीक्षेचा निकाल लागल्यानंतर दुसऱ्या दिवशी यशस्वी विद्यार्थ्यांचे नाव तसेच त्यांचे फोटो वर्तमानपत्रामध्ये छापून आले होते. या परीक्षेत चांदनी चंद्रन या यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होऊ शकल्या नव्हत्या. परीक्षाच उत्तीर्ण न झाल्यामुळे त्यांची चर्चे कोठेच नव्हती. वर्तमानपत्रात त्यांचे यशस्वी विद्यार्थ्यांसोबत नाव नव्हते. मात्र, त्याच दिवशी चंद्रन आपल्या प्रियकरासोबत फिरताना पेपरमध्ये झळकल्या होत्या.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area