इचलकरंजी दहशत माजवीणाऱ्या युवकास अटक

सोशल मिडीयावर (social media) दहशत माजविणारा स्टेटस ठेवल्याप्रकरणी दत्तनगर परिसरातील एकावर शहापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. योगेश उत्तम तुप्परवाडकर असे त्याचे नांव असून त्याला अटक करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, शहरातील दत्तनगर गल्ली नंबर ३ येथे राहणारा योगेश तुप्परवाडकर हा पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. ‘त्याने मोबाईलवर व्हॉटस्अॅपवर स्टेटसला (social media) वादग्रस्त मेसेज ठेवला होता. त्यामध्ये संपलो नाही, संपवणार आहे, थोडे दिवस… तुझा पण गेम मीच वाजवणार आहे’ असा इशारा देणारा मजकूर होता.

तसेच त्यामध्ये चाकूसारखे हत्यार दाखवून त्याला संवाद दिला आहे. त्यातून समाजात गुन्हेगारीची दहशत माजवण्याचा प्रयत्न होत असल्याने हा प्रकार शहापूर पोलिसांच्या निदर्शनास आल्याने पोलिसांनी तात्काळ संशयित योगेश तुप्परवाडकर याला ताब्यात घेवून अटक केली.

त्याला न्यायालयासमोर हजर केले असता ९ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. ही कारवाई पोलिस निरीक्षक श्रीप्रसाद यादव यांच्या नेतृत्वाखाली पोलिस नाईक आसिफ शिराजभाई, रवी कोळी, साजिद कुरणे, पोलिस कॉन्स्टेबल अमित भोरे यांच्या पथकाने केली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area