इचलकरंजीतील जुना पुल वाहतूकीसाठी बंद


इचलकरंजी :  
कोकण आणि धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे नदी-नाले – ओढे दुथडी भरून वाहू आहेत. परिणामी पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वेगाने वाढ होत चालली आहे.(transport service close in ichalkaranji) 
गत दोन दिवसांपासून शहरात हजेरी लावलेल्या पावसाने बुधवारी काही क्षणाचा उसंत सोडला तर संततधार कायम आहे. पाणी पातळीत वाढ होऊन पंचगंगा अवघ्या दोन महिन्यातच दुसऱ्यांदा पात्राबाहेर पडली आहे. 
बुधवारी दिवसभरात तीन फुटांची वाढ झाल्याने सायंकाळी पाणी पातळी सायंकाळी ५७ फुटांवर पोहचली होती. पाणी पातळीत वाढ होत चालल्याने जुन्या पुलाला पाणी घासू लागले आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून जुन्या पुलाच्या दोन्ही बाजूस बॅरेकटेस लावून तो वाहतुकीसाठी बंद (transport service) करण्यात आला आहे. नदीकाठावर आपत्कालीन यंत्रणाही तैनात केली आहे. दिवसभर संततधार सुरुच असल्याने जनजीवनही विस्कळीत झाले असून वातावरणात कमालीचा गारवा निर्माण झाला आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area