लंडन : पूर्वी केवळ टेस्ट क्रिकेट खेळवलं जायचं, मग एकदिवसीय आता टी-20 सह 10 षटकांचे टी-10 क्रिकेटही खेळवलं जातं. पण आम्ही तुम्हाला असा एक सामना सांगणार आहोत जो याहूनही छोटा होता. विचार करा एखादा सामना सुरु होण्याची तुम्ही वाट पाहत असता आणि काही कामामुळे तुम्ही थोडा उशीरा सामना पाहायला घेता पण तोवर कळतं की सामना सुरु होऊन संपला आहे. असं होऊ शकतं जेव्हा एखादा संघ 7 धावांवर सर्वबाद होऊन दुसऱ्या संघाने लगेचच या धावा बनवत टार्गेट चेस केलं. हो असा सामना झाला आहे, ज्यात दोन्ही संघानी मिळून केवळ 56 चेंडूच टाकत सामना संपला. तर हा सामना होता इंग्लंडच्या (England) यॉर्कशर प्रीमियर लीगमध्ये (Yorkshire Premier League) ईस्टरिंगटोन क्लब आणि हिलम एंड मॉन्क फ्रिस्टन क्रिकेट क्लब (Hillam Monk Fryston vs Eastrington Cricket Club) यांच्यात पार पडलेला. काही तासांतच संपलेल्या या सामना क्रिकेट इतिहासातील अत्यंत छोट्या आणि कमी वेळ चाललेल्या सामन्यांपैकी एक आहे. (In Yorkshire Premier League Hillam Monk Fryston Cricket Club All Out on 7 Runs Eastrington Cricket Club Won by 10 wicket)
सामन्यात हिलम एंड मॉन्क फ्रिस्टन क्रिकेट क्लब प्रथम फलंदाजीसाठी मैदानात आला. पाहता पाहता एक-एक गडी बाद होत गेला आणि स्कोरबोर्डवर रनांच्या जागी विकेट्स जास्त पडलेल्या दिसून येत होत्या. अगदी अशाप्रकारे फलंदाज बाद होत होते की एक जायचा आणि दुसरा मागोमाग यायचा. विशेष म्हणजे प्रतिस्पर्धी संघ ईस्टरिंगटोन क्लबला तिसऱ्या गोंलदाजाती गरजही पडली नाही. दोन गोलंदाजांनी मिळूनच हिलम एंड मॉन्क फ्रिस्टन क्रिकेट क्लबचे 10 ही फलंदाज बाद केले. संपूर्ण संघाने मिळून 8 ओव्हर खेळले आणि अवघ्या 7 धावांवर ऑलआउट झाले. ज्याती 8 फलंदाज शून्यावर बाद झाले.
विजयासाठी 7 धावांचे टार्गेट
पहिली इनिंग संपल्यानंतर ईस्टरिंगटोन क्लबला विजयासाठी 8 धावांचे टार्गेट होते. हे टार्गेट ईस्टरिंगटोनच्या सलामी फलंदाजानी अवघ्या 1.2 ओव्हरमध्ये पार करत 8 चेंडूत 8 रन करत पार केले आणि तब्बल 10 विकेट राखत विजय मिळवला. जेम्स केंद्र या एका फलंदाजाने एका चौक्यासह 7 धावा केल्या आणि एका अतिरिक्त धावेमुळे ईस्टरिंगटोन क्लब विजयी झाला.