Ind vs SL : धोनीचा ‘हुकमी एक्का’ श्रीलंकेच्या संघावर भारी, आकाश चोप्रा म्हणाला, ‘चमकते रहो दीपक!’

 

मुंबई :  संघातील वरच्या फळीतील प्रमुख खेळाडू बाद झालेले असताना देखील अष्टपैलू खेळाडू आणि धोनीचा हुकुमी एक्का असलेल्या दीपक चाहरने (Deepak Chahar) शेवटपर्यंत खिंड लढवून भारतीय संघाला रोमहर्षक विजय मिळवून दिला. अटीतटीच्या झालेल्या या मॅचमध्ये भारतीय संघाने श्रीलंकेवर (India vs Sri Lanka) तीन विकेट्सने मात करत तीन सामन्यांची मालिका 2-0 ने घातली. सामन्यात एकवेळ अशी आली होती की भारताचा पराभव होईल असं वाटत होतं पण दीपकने सामन्याची सूत्रं हातात घेऊन सामना भारताच्या बाजूने झुकवला. श्रीलंकन संघाने भारताच्या प्रमुख खेळाडूंना बाद केलं पण एकटा दीपक श्रीलंकेवर भारी पडला. (India vs Sri Lanka 2nd ODI Cricket Fans Appriciate Deepak Chahar batting Performance)

टीम इंडियाच्या विजयाचा खरा नायक ठरला तो दीपक चाहर…. संघाचे प्रमुख खेळाडू बाद झाल्यानंतर भारत सामना हरणार असं समीकरण झालेलं होतं परंतु त्याच वेळी मैदानात चाहरची एन्ट्री झाली आणि त्याने संयमी खेळी करत भारताला विजय मिळवून दिला. चाहरने 69 धावा केल्या. चाहरने एकेरी दुहेरी धावा काढत घेत संधी मिळेल तसे आक्रमक शॉट्सही लगावले. भुवनेश्वर कुमारने त्याला उत्तम साथ दिली. याशिवाय सूर्यकुमार यादवने देखील अर्धशतकी खेळी करत आपली छाप सोडली. कुणाल पांड्या 35 धावा करून पॅव्हेलियनमध्ये मध्ये परतला. क्रुणाल पांड्याने 35 धावा केल्या.

धोनीची हुकमी एक्का

दीपक चहर आयपीएल संघात चेन्नई सुपर किंग्स संघाकडून खेळतो. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात खेळत असलेला दीपक वेळोवेळी आपली छाप सोडतो. बऱ्याच वेळा बोलिंगमध्ये धोनीनं हुकमी एक्का म्हणून त्याचा वापर केला आहे. अगदी संघाला पाहिजे तेव्हा तो विकेट्स मिळवून देतो. चेन्नईकडून खेळत असताना चाहरवर बॅटिंगची तितकीशी वेळ येत नाही. परंतु आज त्याला संधी मिळताच त्याने बोलिंगबरोबर बॅटिंगमध्ये देखील कमाल करून दाखवली. टीम इंडियाच्या विजयाचं हे धोनी कनेक्शन मानलं जातंय.

पायाचे स्नायू दुखावले गेले पण विजय मिळेपर्यंत खेळपट्टीवरुन हलला नाही!

सामन्यादरम्यान चाहरच्या पायाचे स्नायू दुखावले गेले. पण तरीही खेळपट्टीवर तळ ठोकत भारतीय संघाला विजय मिळेपर्यंत तो विचलित झाला नाही. त्याच्या खेळीने सोशल मीडियावर त्याचं खूपच कौतुक होतंय.  ‘विजयाचा हिरो’, ‘चमकते रहो दीपक’ वगैरे, असे मेसेज ट्विटरवर ओसडूंन वाहू लागलेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area