IND-W vs ENG-W : इंग्लंड विरुद्ध पराभवानंतरही स्मृतीचं अर्धशतक ‘हिट’, अनेक विक्रम केले नावावर

 


लंडन : भारतीय महिला क्रिकेट संघाला (India Women Cricket Team)  इंग्लंडच्या दौैऱ्यातील (England Tour) शेवटच्या सामन्यातही पराभव पत्करावा लागला. एकदिवसीय सामन्यांची मालिका गमावल्यानंतर टी-20 मालिका भारत जिंकेल असे वाटत असतानाच अखेरचा सामना 8 विकेट्सने गमावल्यावर ही मालिकाही 2-1 ने भारताच्या हातातून निसटली. पण या सामन्यात भारताची सलामीवीर आणि स्टार फलंदाज स्मृती मंधाना (Smriti Mandhana) हिने दमदार 70 धावांची खेळी करत आपल्या कारकिर्दीतील 13 वे आंतरराष्ट्रीय टी-20 अर्धशतक ठोकले. या अर्धशतकासोबतच तिने काही खास विक्रमही आपल्या नावे केले.

स्मृतीने 51 चेंडूत 8 चौकार आणि 2 षटकार ठोकत 70 धावा केल्या. तिच्या या अर्धशतकी खेळीसह ती भारतीय क्रिकेट महिला संघातून परदेशात सर्वाधिक अर्धशतकं ठोकणारी खेळाडू ठरली. तिची परदेशी भूमितील ही सातवी 50 प्लस खेळी होती. यासोबतच मंधानाह सर्वाधिक टी-20 अर्धशतकं ठोकणारी डावखुरी महिला फलंदाज ठरली आहे. तिने ठोकलेले हे अर्धशतक तिच्या कारकिर्दीतील 13 वे टी-20 अर्धशतक होते. तिने ऑस्ट्रेलियाच्या बेथ मूनीला मागे टाकलं आहे. मूनीच्या नावावर 12 अर्धशतकं आहेत. तर तिसऱ्या स्थानावर पाकिस्तानची बिस्माह मारूफ असून तिच्या नावावर 11 अर्धशतकं आहेत.असा झाला सामना

प्रथम फलंदाजी करताना भारताने स्मती मंधानाच्या 70 धावांच्या जोरावरच  इंग्लंडसमोर 153 धावांचे लक्ष्य ठेवले. कारण स्मृती सोडता कर्णधार हरमनप्रीत कौर (36) आणि रिचा घोष (20) यांच्याशिवायत कोणत्या फलंदाजाला दुहेरी आकडाही गाठता आला नाही. मात्र इंग्लंडकडून सलामीवीर डॅनी वायटने (Danni Wyatt) 89 धावांची तुफानी खेळी खेळत 19 व्या ओव्हरमध्येच संघाला विजय मिळवून दिला. भारताच्या गोलंदाजीचा विचार करता दिप्ती शर्मा आणि स्नेह राणा यांनी प्रत्येकी 1 विकेट मिळवला. ज्यामुळे इंग्लंडने 8 विकेट्सनी दमदार विजय आपल्या नावे केला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area