‘प्यार का कोई धर्म नही होता…’ भारतीय खेळाडू शिवम दुबे मैत्रीण अंजुम खानशी विवाहबद्ध

 

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू शिवम दुबेने (Shivam Dube) धर्माच्या भिंती ओलांडत कट्टरतावाद्यांच्या मुस्कटात लावली आहे. त्याने आपली मुस्लिम मैत्रीण अंजुम खानशी (Anjum Khan) लग्न केलंय. मुंबईतल्या एका हॉटेलमध्ये हे जोडपं विवाहबद्ध झालंय. शिवमने त्याच्या ट्विटर हँडलवरुन लग्नाचे काही क्षण, क्षणचित्रे शेअर केले आहेत. चाहत्यांनी नवदाम्पत्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. (Indian Cricket player Shivam dube Married his GirlFriend Anjum Khan)

“आम्ही प्रेमावर प्रेम केलं…”

अनेक मॅचेसमध्ये महत्तवपूर्ण खेळी करणाऱ्या शुभमने आता आपल्या आयुष्यातील दुसऱ्या इनिंगला सुरुवात केली आहे. “आम्ही प्रेमावर प्रेम केलं… जे प्रेमापेक्षा जास्त होतं.. आता आमचं नवं आयुष्य सुरु होतं…. जस्ट मॅरिड 16-07-2021…!”, असं कॅप्शन देत शिवमने पत्नी अंजुमसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर

शिवमने शेअर केलेल्या फोटोंमध्ये नवदाम्पत्य फारच गोड दिसत आहे. एकूण तीन फोटो शिवमने शेअर केले आहेत. पहिल्या फोटोमध्ये उभयतांनी कॅमेराकडे पाहून स्मितहास्य केलंय… दुसऱ्या फोटोत अंजुम खान दुवा मागताना दिसून येत आहे. तर तिसऱ्या फोटोत शिवम अंजुमच्या बोटात अंगठी घालत आहे…

लवकरच आयपीएलमध्ये खेळताना दिसणार

शिवम दुबे याआधी विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली बंगळुरु संघाचा हिस्सा होता. मात्र 2021 पासून तो राजस्थान रॉयल्स संघात खेळतो. आता काही महिन्यातच यूएईमध्ये होणाऱ्या आयपीएलच्या उर्वरित मॅचेसमध्ये लग्नानंतर शिवम खेळताना दिसेल.

14 सामन्यात भारताचं प्रतिनिधित्व

शिवमने भारताकडून पहिला आंतरराष्ट्रीय सामना नोव्हेंबर 2019 मध्ये बांगलादेशविरुद्ध खेळला. त्याने 13 टी ट्वेन्टी आणि एका एकदिवसीय मॅचमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं. आंतरराष्ट्रीय स्तरावर तो शेवटच्या वेळी फेब्रुवारी 2020 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area