Rocky Aur Rani Ki Prem Kahani : ‘गली बॉय’नंतर करण जोहरने पुन्हा बनवली रणवीर-आलियाची जोडी, पुढच्या वर्षी रिलीज होणार चित्रपट!

 


मुंबई : दिग्दर्शक-निर्माता करण जोहर (Karan Johar) याने त्याच्या पुढच्या चित्रपटाची घोषणा केली आहे. ‘रॉकी और रानी की प्रेमकथा’ (Rocky Aur Rani Ki Prem Kahani) असे या चित्रपटाचे नाव आहे. करण जोहर स्वत: या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. या चित्रपटासाठी करण जोहरने रणवीर सिंह (Ranveer Singh) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांना मुख्य भूमिकांसाठी साईन केले आहे (Karan Johar Announces his next project Rocky Aur Rani Ki Prem Kahani starring Ranveer Singh and Alia Bhatt).

या प्रोजेक्टची घोषणा करताना करण म्हणाला की, हा चित्रपट 2022 मध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल. स्वतः करण जोहरने काल जाहीर केले होते की, तो तब्बल 5 वर्षानंतर पुन्हा दिग्दर्शनाकडे परत येत आहे. ‘कुछ कुछ होता है’ ने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात करणारा करण जोहर आज देशातील सर्वात मोठा चित्रपट निर्माता झाला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area