कोल्हापूरात सासूची जावयाला धमकी

 

‘माहेरी आलेल्या पत्नीला घरी घेऊन जायचं असेल; तर दहा लाख रुपयांची खंडणी (ransom) दे, नाहीतर पत्नीला बलात्काराचा गुन्हा (rape case) दाखल करायला लावेल’ अशा शब्दांत सासूनं आपल्या जावयाला धमकी (Threat to son in law) दिल्याची घटना समोर आली आहे.

या प्रकरणी पीडित जावयानं पत्नी आणि सासूसहित पाच जणांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी खंडणीसह (ransom) अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल (FIR lodged) केला असून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

सासू संगीता गायकवाड, पत्नी आशा बेनाडी (दोघी रा. कुरूंदवाड), स्वप्निल नाईक (रा. पट्टणकोडोली, ता. हातकणंगले), संजय महाडिक (रा. शेडशाळ), संतोष हातनाळे (रा.कोथळी) अशी गुन्हा दाखल झालेल्या पाच आरोपींची नावं आहेत.

30 वर्षीय पीडित पती लखन आण्णाप्पा बेनाडे यांनी ही तक्रार जयसिंगपूर पोलीस ठाण्यात दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केली नसून या घटनेची चौकशी केली जात आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area