कोल्हापुरात राजकीय समिकरणे बदललीकोल्हापुर पालकमंत्री सतेज पाटील आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी आमदार पी. एन पाटील यांचे चिरंजीव राहुल पाटील यांच्या जिल्हा परिषदे अध्यक्षाची माळ गळ्यात घातली. दरम्यान पालकमंत्री सतेज पाटील यांनी आपल्या विधान परिषदेची तर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीची (election) पेरणी केल्याचे बोलले जात आहे.

त्याचबरोबर या घडामोडींमुळे महाडिक व आ. पी. एन. पाटील यांच्या राजकीय मैत्रीत दुराव्याची बीजे पेरल्याचेही समजले जात आहे.

गोकुळच्या निवडणुकीने (election)  जिल्ह्यातील सर्वच राजकीय समीकरणे बदलून टाकली आहेत. या निवडणुकीत पालकमंत्री पाटील व मंत्री मुश्रीफ तसेच आ. पी. एन. पाटील आणि माजी आ. महोदवराव महाडिक यांच्यात समोरासमोर थेट लढत झाली होती.अशा परिस्थिती जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीत राहुल पाटील यांच्या एंट्रीने सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area