कोरोना प्रतिबंधात्मक (covid-19) आदेशानुसार लागू करण्यात आलेले निर्बंध (restriction) सोमवार (५) ते शुक्रवार (९) या पाच दिवसांसाठी शिथिल करण्यात आले आहेत. (kolhapur city) या आठ दिवसांत शहरातील अत्यावश्यक सेवेसह इतर सर्व दुकाने सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत, अशी माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
जनभावनेचा विचार करून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महसूल मंत्री यांनी शहरातील निर्बंध पाच दिवसांसाठी शिथिल केले आहेत. या कालावधीत शहरातील सर्व व्यवहार सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत.
आठ दिवसांनंतरची रुग्ण संख्या लक्षात घेऊन पुढील आदेश लागू केले जातील. मात्र जर या कालावधीनंतर रुग्ण संख्येत अपेक्षेपेक्षा अधिक वाढ झाली तर मात्र पुन्हा कडक निर्बंध (restriction) लागू केले जातील. असे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
सर्व सुरू झाले असले तरी नागरिकांनी गरज नसताना घराबाहेर पडू नये. तसेच विनाकारण गर्दी करू नये. यामुळे जर रुग्ण संख्या वाढली तर शासनाला पुन्हा निर्बंध लावण्याचा निर्णय दुर्दैवाने घ्यावा लागेल.
आपण केलेल्या एखाद्या अनावश्यक कृतीमुळे हातावर पोट असणाऱ्या हजारो गरजू लोकांना विनाकारण त्रास सहन करावा लागू नये. याचासुद्धा विचार सर्वांनी करावा. त्यामुळे सर्वांनी योग्य ती दक्षता घेऊनच शहरातील व्यवहार सुरू ठेवावेत