कोल्हापुरात नियमांना केराची टिपली

 


कोल्हापूर : जिल्ह्यातील पॉझिटीव्ह रेट (positive rate) कमी येत नसल्याने प्रशासनाने आजपासून निर्बंध (restriction) कडक केले; पण संचारावर निर्बंध, रस्त्यावर गर्दी तुडुंब असेच चित्र शहरातील रस्त्या रस्त्यावर पाहायला मिळाले. सोमवारपासून दुकाने उघडणारच अशी व्यापाऱ्यांनी घेतलेली भूमिका आज मवाळ केली.

बहुतांशी दुकाने बंदच होती. काही व्यापाऱ्यांनी नेहमीप्रमाणे मागील दाराने विक्री सुरू होती. याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले. लोकांचा एकमेकांशी अधिक संपर्क येऊ नये म्हणून निर्बंध कडक केले होते. मात्र प्रशासनाच्या या निर्णायाला हारताळ फासला गेल्याचे आजच्या गर्दीवरून दिसते.

राज्यातील कोरोनाची (covid-19) रुग्ण संख्या कमी झाली असली तरी कोल्हापुरातील रुग्णसंख्या पंधराशे ते दोन हजार या दरम्यान आहे. त्यामुळे प्रशासनाने पाच दिवसांसाठी शिथिल केलेले निर्बंध (restriction) १२ पासून अधिक कडक केले. या मध्ये अत्यावश्यक सेवा सोडून सर्व दुकाने, मॉल्स, उपहारगृहे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी या उपाययोजना केल्या होत्या. मात्र आज दिवसभरात शहरातील (kolhapur city) सर्व रस्त्यावरून गर्दीचे लोंढे दिसत होते. चौकाचौकामध्ये वाहतुकीची कोंडी झाली होती. सकाळी मंडईमध्येही भाजी खरेदीसाठीही गर्दी होती. येथे सोशल डिस्टन्सिंगचे (social distance) नियम पाळले जात नव्हते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area