कोल्हापूर जिल्ह्यातील ९४० शाळांची घंटा वाजली. कोरोनामुक्त गावातील शाळा (school) सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील 940 माध्यमिक शाळा सुरू झाल्या आहेत. पहिल्या दिवशी सुमारे 1 लाख 55 हजार विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावल्याने परिसर पुन्हा गजबजून गेला आहे.
त्यामुळे विद्यार्थी, पालकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.जिल्ह्यात माध्यमिकच्या सुमारे 1054 स्कूल असून त्यामध्ये सुमारे 2 लाख विद्यार्थी संख्या आहे.