कोल्हापूर जिल्ह्यात दुकाने उघडणार कि नाही, निर्णय झाला….

 ‘अनलॉक’(Unlock) बाबत शहराला एक आणि ग्रामीण भागाला दुसरा असा न्याय असणार नाही. दुकाने (shops) उघडण्याबाबत जो काही निर्णय होईल, तो जिल्ह्यासाठी लागू होईल, असे संकेत राज्य शासनाकडून (government) मिळत आहेत.

आजपासून केवळ अत्यावश्‍यक सेवेतील दुकाने सुरू राहतील. अन्य दुकानाबाबत निर्बंध कायम असल्याचे प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे (dr. kadambari balkavde) यांनी सांगितले.

कोरोना नियमासंबंधी कोल्हापूर जिल्हा सध्या शासनाच्या चौथ्या स्तरात आहे. अन्य दुकाने (shops) उघडण्यासाठी तिसऱ्या टप्यात कोल्हापूरचा समावेश होणे गरजेचे आहे, त्यासाठी पॉझिटिव्हिटी रेट दहा टक्क्यांच्या खाली येणे आवश्‍यक आहे.

इचलकरंजी येथे याच कारणावरून आंदोलन झाले. त्यामुळे यापुढे शहर तसेच ग्रामीण पॉझिटिव्हिटी वेगवेगळा न करता जो काही निर्णय लागू होईल, तो जिल्ह्यासाठी असेल, असे संकेत मिळत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area