Kolhapur Unlock : येत्या सोमवारपासून जिल्ह्यातील दुकाने उघडणार. सकाळी 7 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत सर्व दुकाने खुली होतील.
शनिवार, रविवार अत्यावश्यक दुकाने वगळता इतर दुकाने (shop)बंद राहतील. या आदेशानुसार सोमवार ( दि. १९ ) पासून जिल्ह्यातील सर्व दुकाने सकाळी ७ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे.
ही मुभा सोमवार ते शुक्रवार पर्यंतच लागू असणार आहे. त्यानंतर शनिवार रविवार हे विकेंड लॉकडाऊनचे दिवस असल्याने अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहतील.
कोल्हापुरात निर्बंध स्तर ३ मधील नियम हे सोमवार दि. १९ पहाटे ५ वाजल्यापासून लागू होतील. हे नियम पुढील आदेश मिळेपर्यंत लागू राहणार आहेत.