करोना झाल्याने वाढदिवशीच सिव्हिल इंजिनीअरची आत्महत्या

 

सांगलीः करोना संसर्गाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याच्या भीतीने सांगली जिल्ह्यातील तरुणानं वाढदिवसादिनीच आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. बुधवारी रात्री ही घटना घडली आहे.

सांगली येथे राहणाऱ्या निखील लक्ष्मण भानुसे (२८) असं या तरुणाचं नाव आहे. निखील हा व्यवसायाने सिव्हिल इंजिनिअर होता. चार दिवसांपूर्वीच त्याचा करोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. करोनाचा संसर्ग झाल्यापासून तो अस्वस्थ होता. त्याच नैराश्यातून त्यानं आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं.

निखीलचं तीन महिन्यांपूर्वीच लग्न झालं होतं. पण करोनाची भीती मनात बसल्यानं त्यानं आत्महत्येचा निर्णय घेतला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. बुधवारी रात्री घरासमोरील जनावरांच्या शेडमध्ये गळफास लावून घेतला. अशी फिर्याद नातेवाईकांनी पोलिसांत दिली आहे. याप्रकरणी कुरळप पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद झाली आहे.
सातारा, सांगलीत संक्रमण अधिक

साथ वाढण्यास पोषक स्थिती, हवामान, नागरिकांचा वाढणारा संपर्क, नियमांचे उल्लंघन; तसेच रोग प्रतिकारशक्ती कमी झाल्याने सातारा, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात उशिराने साथीचा प्रसार झाल्याचे चित्र दिसून येत आहे. मोठ्या शहरांमध्ये सुरुवात पहिल्यांदा होते आणि त्यानंतर उशिरा दुसऱ्या शहरांमध्ये होत असल्याने सातारा, सांगली, कोल्हापूरसह कोकणातील जिल्ह्यांमध्ये दुसरी लाट उशिराने आली, असं मत तज्ज्ञांनी नोंदवलं आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area