LPG Gas Cylinder Price: घरगुती सिलेंडरचे भाव पुन्हा एकदा ‘इतक्या’ रुपयांनी वधारले, जाणून घ्या नवा भाव

 

LPG Gas Cylinder Price hike: तेल विपणन कंपन्यांनी देशांतर्गत एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत वाढ केली आहे. आता आपल्याला घरगुती सिलेंडरवर आजपासून 25.50 रुपये अधिक द्यावे लागणार आहेत. देशाची राजधानी दिल्लीत आता घरगुती एलपीजी सिलिंडरची (14.2 किलो) किंमत 809 रुपयांवरून 834.50 रुपयांवर गेली आहे. त्याचप्रमाणे आजपासून देशातील विविध शहरांमध्ये घरगुती सिलेंडरवर नवीन किंमत लागू करण्यात आली आहे (LPG Gas Cylinder Price Hike from 1 july 2021 rate increased by 25 rupees).

शासकीय तेल विपणन कंपन्या (Oil Companies) दर महिन्याच्या पहिल्या दिवशी गॅस सिलिंडरच्या किंमतींचा आढावा घेतात. यानंतर, ते किंमतीत वाढ करण्याचा किंवा कमी करण्याचा किंवा स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतात.

मोठ्या शहरांमधील नवीन किंमती

कोलकाता – 861 रुपये

मुंबई – 834.50 रुपये

चेन्नई – 850.50 रुपये

आणखी काही शहरांमधील नवीन किंमत

उत्तर प्रदेशच्या लखनऊमध्ये एलपीजी सिलिंडरची किंमत 872.50 रुपयांवर गेली आहे. त्याचप्रमाणे गुजरातच्या अहमदाबादमध्ये एलपीजीसाठी 841.50 रुपये द्यावे लागतील. चंदीगडमधील या सिलिंडरची किंमत आता 844 रुपयांवर गेली आहे.

जानेवारीपासून सिलिंडर 140.50 रुपयांनी महागले!

दिल्लीत यंदा जानेवारीत एलपीजी सिलिंडरची किंमत 694 रुपये इतकी होती. त्यानुसार यावर्षी जानेवारीपासून 14.2 किलो घरगुती एलपीजी सिलिंडर 140.50 रुपयांनी महाग झाले आहेत.

व्यावसायिक वापराच्या सिलिंडरच्या (19 किलो) किंमतीही वाढल्या!

इंडियन ऑईलच्या वेबसाईटनुसार, आता दिल्लीत कमर्शियल सिलिंडरची (19 किलो) नवी किंमत 1473.5 रुपयांवरून वाढून 1550 रुपये झाली आहे. यापूर्वी 1 जून रोजी या सिलिंडरच्या किंमतीत 122 रुपयांची कपात करण्यात आली होती.

आजच्या अगोदर, 1 मे रोजी कंपन्यांनी एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल केलेला नव्हता. यामुळे गेल्या एप्रिलमध्ये एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत दहा रुपयांची घट झाली होती, तर यावर्षी फेब्रुवारी आणि मार्चमध्ये सिलिंडरच्या किंमतीत वाढ करण्यात आली होती.

महिन्याला किंमतीची समिक्षा

भारतात LPG गॅसची किंमत तेल कंपन्या ठरवतात. भारतात जवळपास अधिकाधिक घरांमध्ये LPG कनेक्शन आहेत. या गॅसचा उपयोग खासकरुन स्वयंपाकासाठी केला जातो. LPG गॅसच्या किमतीत झालेली वाढ ही खास करुन सर्वसामान्य नागरिकांवर परिणाम करते. कारण सध्यस्थिती वाढलेल्या तेलाचे भाव आणि गॅसच्या किमतीचा फटका हा सर्वसामान्यांना बसतो. दरम्यान सरकार अनुदानाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करतं. त्याचबरोबर तेल कंपन्या नव्या योजना चालवून ग्राहकांना सुविधा देण्याचा प्रयत्न करतात.

एलपीजी किंमत कशी तपासायची?

स्वयंपाक गॅसची किंमत तपासण्यासाठी आपल्याला सरकारी तेल कंपनीच्या वेबसाइटवर जावे लागेल. येथील कंपन्या दरमहा नवीन दर जारी करतात. https://iocl.com/Products/IndaneGas.aspx या लिंकला भेट देऊन आपण आपल्या शहरातील गॅस सिलिंडर्सचे दर तपासू शकता.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area