स्वतःच्याच लग्नात नवरदेवाचा वहिनीवर बलात्कार, नणंदेचीही आरोपीला साथ

भोपाळ : नवरदेवाने स्वतःच्याच लग्नात आपल्या वहिनीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशात उघडकीस आली आहे. पीडित विवाहिता आपल्या मामे सासऱ्यांच्या मुलाच्या (मामेदीर) लग्नासाठी आली होती. मात्र यावेळी नवरदेवाच्या बहिणीने म्हणजेच तिच्या नणंदेने तिला एका खोलीत बंद केले. त्यानंतर नवरदेवाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. आठ जुलै रोजी ही घटना घडली होती.

तीन वेळा बलात्कार केल्याचा आरोप

आरोपी नवरदेवाने पीडिताला जीवे मारण्याची धमकीही दिली होती. सांवेर पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी नवरदेवासह त्याच्या बहिणीलाही अटक केली आहे. न्यायालयात हजर केल्यानंतर दोघांचीही तुरुंगात रवानगी करण्यात आली. आरोपी अनिल हा आपला मामेदीर असल्याचं पीडितेने सांगितलं. आरोपीने एकूण तीन वेळा आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप तिने केला आहे.

नेमकं काय घडलं?

अनिलच्या लग्नासाठी पीडिता सांवेरला गेली. यावेळी तिच्या नणंदेने तिला एका खोलीत नेलं आणि दरवाजा बंद केला. आरोपी नवरदेव त्यावेळी हाताला मेहंदी लावून बसला होता. तो त्यावेळी मद्यधुंद अवस्थेत होता. त्यानंतर नणंदेने तिला जमिनीवर ढकलून पकडलं, तर नवरदेवाने तिच्यावर बलात्कार केला.

लग्नाच्या दिवशी पीडितेने याची वाच्यता कुठेही केली नाही. मात्र लग्नानंतर पुन्हा एकदा नणंदेने तिला जवळच्या एका घरात जबरदस्ती नेलं, तिथेही नवरदेवाने तिच्यावर बलात्कार केला. लग्नाहून घरी परत आल्यानंतर विवाहितेची तब्येत बिघडली होती. त्यामुळे तिने आपल्या पतील्यावर झालेल्या अत्याचाराविषयी माहिती दिली. त्यानंतर दोघांनी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area