चिपळूण, कोकणातील पूरस्थिती आटोक्यात, दरडी कोसळल्यानं परिस्थिती गंभीर, कोयनेत पाण्याची विक्रमी आवक, जयंत पाटील यांची माहितीपुणे: महाराष्ट्रात ठिकठिकाणी पावसाचा कहर सुरु आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा जिल्ह्यात दरड कोसळल्याच्या घटना घडत आहेत. महाबळेश्वर, कोयना धरण परिसरात प्रचंड पाऊस होत आहे. यासंदर्भात राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी टीव्ही 9 मराठीशी बातचीत केली. चिपळूण, कोकणातील पूरस्थिती आटोक्यात पण दरडी कोसळताहेत. स्वत: उद्धव ठाकरे परिस्थिती लक्ष ठेऊन आहेत. सांगली साताऱ्यातील पूरस्थिती आटोक्यात आहे, तिथं पावसाच्या पाण्यामुळेच काही ठिकाणी पूर आलाय, कोयनातून 45 हजार क्यूसेक विसर्ग सुरू आहे, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली आहे.

अलमट्टीतून अडिच लाखांचा विसर्ग

कर्नाटक सरकार शी बोलणी सुरू आहे, अलमट्टीतून अडिच लाखांचा विसर्ग सुरू ठेवण्यासाठी ते प्रतिसाद देताहेत, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली. पूरग्रस्त भागातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे, असंही त्यांनी सांगितलं.

कोल्हापुरात पावसाच्या पाण्यानेच पूर आलाय

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाच्या पाण्याचनेच पूर आलेला आहे. धरणांमधून पाणी सोडण्याचं नियोजन अजिबात चुकलेलं नाही, असही त्यांनी स्पष्ट केलं.

कोयनेच्या इतिहासात विक्रमी पाऊस

कोयना धरणात गेल्या दोन दिवसात 18 टीएमसी पाणी जमा झालंय. हा विक्रम आहे. साताऱ्यातील नवजा येथे 700 मिमी पाऊस पडला, महाबळेश्वराला देखील मोठ्या प्रमाणावर पाऊस होतोय, म्हणून धरण आत्तापासूनच खाली करायला सुरू केलंय जेणेकरून भविष्यात पूर येऊ नये. कोयना धरणात यापू्र्वी 24 तासात 12 टीएमसी पाणी जमा होण्याचा रेकॉर्ड आहे. तो यावेळी मोडला गेलाय, असंही जयंत पाटील यांनी सांगितलं.

बचावकार्य व्यवस्थित

70 टक्के धरण भरल्यानंतर पाणी सोडण्याचं नियोजन आहे आणि त्याच प्रमाणे पाणी सोडलं जातंय. बचावकार्याचं नियोजन व्यवस्थित सुरू आहे. कुठेही बोटींची कमतरता नाही, पाऊसच जास्त पडल्याने हा पूर आलाय, असंही जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

महाबळेश्वरमध्ये 48 तासात 1074.4 मिमी पाऊस

सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरमध्ये गेल्या 48 तासात 1074.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. आज दुपारपर्यंत महाबळेश्वरमध्ये 142 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

सांगलीतील रस्ते पाण्याखाली

सांगली जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून संततधार पडणाऱ्या पावसामुळे कृष्णा आणि वारणा नद्यांना पूर आला आहे.त्यामुळे जिल्ह्यातील अनेक पूल आणि बंधारे पाण्याखाली गेले आहेत.तर या पुराच्या पाण्यामुळे जिल्ह्यातील 25 ठिकाणा वरील रस्ते पाण्याखाली गेले आहेत.ज्यामध्ये 8 राज्यमार्ग आणि 18 जिल्हा मार्गांचा समावेश आहे. यामध्ये शिराळा,पलूस मिरज आणि वाळवा तालुक्यातील रस्त्यांचा यामध्ये समावेश आहे.त्या ठिकाणची वाहतूक बंद करण्यात आली असून अन्य मार्गावरून ही वाहतूक वळविण्यात आली आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area