मेट्रोत नोकरीचे आमिष दाखवून बेरोजगार युवकांना गंडा

 नागपूर : मेट्रो रेल्वेत नोकरीचे आमिष दाखवून बेरोजगार युवकांना गंडा घालण्यात आला. याप्रकरणी वाडी पोलिसांनी गौरव अशोक उके (वय २७, रा. अशोक लेआउट, सुराबर्डी) याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. अपूर्वा अरुण रामटेके (वय २५, रा. नवनीतनगर) या तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. जुलै २०१९मध्ये गौरवने अपूर्वा, तिची बहीण मिताली, रोहित यशवंत मेश्राम, प्रांजल अरुण बागडे, दिशा अरविंद भोस्कर, तिची बहीण रश्मी आदींसह आठ युवकांना मेट्रोत टीसी व पर्यवेक्षकाची नोकरी लावून देण्याचे आमिष दाखविले. गौरवने त्यांच्याकडून ९ लाख १८ हजार रुपये घेतले. तसेच अपूर्वा व रोहित या दोघांना नियुक्तीचे बनावट प्रमाणपत्र दिले. दोघे मेट्रोत गेले असता नियुक्तीपत्र बनावट असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर अपूर्वाने वाडी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

नागपूर : जीओ अॅण्ड केबीसीमध्ये २५ लाखांचे बक्षीस लागल्याचे आमिष दाखवून युवकाला गंडा घालण्यात आला. याप्रकरणी नवीन कामठी पोलिसांनी सायबर गुन्हेगाराविरुद्ध फसवणूक व माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. मुकुल शंकर अंबर्डे (वय २३, रा. येरखेडा) याच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. २१ जूनला सायबर गुन्हेगाराने मुकुलच्या मोबाइलवर संपर्क साधला. केबीसीमध्ये २५ लाख रुपयांचे बक्षीस लागल्याचे आमिष दाखविले. ही रक्कम मिळविण्यसाठी आधी कर जमा करावा लागेल, असे त्याने मुकुलला सांगितले. मुकुलने 'फोन पे'द्वारे १ लाख ४५ हजार रुपये जमा केले. मात्र, त्याला बक्षिसाची रक्कम मिळाली नाही. फसवणूक झाल्याने त्याने नवीन कामठी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area