पुणे : सोन्याच्या आमिषाने सव्वालाखाची फसवणूक; गुन्हा दाखल

 


येरवडा : सोशल मीडियाद्वारे एक ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने देण्याचे आमिष दाखवून सव्वालाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योगेश हिम्मतसिंग ठाकूर (वय ३२, रा. वडगाव शेरी) यांनी फिर्याद दिली आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोशल मीडियाद्वारे एका व्यक्तीने मुंबईतील मालाडमध्ये एक ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने तयार करत असून, आठ वेगवेगळ्या डिझाइनचे २४५ नग विकत देणार असल्याची जाहिरात केली होती. फिर्यादी यांनी जाहिरात पाहून संबंधित व्यक्तीशी मोबाइलवर संपर्क साधला. त्याने सोने खरेदीसाठी सव्वालाख रुपये भरण्यास सांगितले. फिर्यादी यांनी पैसे भरूनही सोने मिळाले नाही.Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area