धक्कादायक! तुरुंगातून बाहेर येताच युवकाची ६४ गोळ्या झाडून हत्या

 


शिकागो: अमेरिकेत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शिकागोतील तुरुंगातून सुटका झाल्यानंतर एका युवकावर काही जणांनी अंदाधुंदपणे गोळ्या झाडत त्याच्या शरीराची चाळण केली. हल्लेखोर आधीपासून तुरुंगाबाहेर दबा धरून बसले होते. जामिनावर सुटका झालेल्या या युवकावर तब्बल ६४ गोळ्या झाडल्या. या हल्लेखोरांचा शोध सुरू आहे.

शनिवारी रात्री ही गोळीबाराची घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ वर्षीय रॅपर लाँड्रे सिलवेस्टरची शिकागोच्या तुरुंगातून सुटका झाली. त्यानंतर तुरुंगाबाहेर दबा धरून बसलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळ्यांचा वर्षाव केला.

सिलवेस्टर तुरुंगातून बाहेर आल्यानंतर घरी जाण्यासाठी वाहनाची प्रतिक्षा करत होता. त्याच वेळेस वेगवेगळ्या वाहनातून आलेल्या हल्लेखोरांनी गोळ्या झाडण्यास सुरुवात केली. यामध्ये रॅपरला डोक्यापासून ते पायापर्यंत ६४ गोळ्या लागल्या. पोलिसांनी जखमी झालेल्या रॅपर सिलवेस्टरला रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तीन हल्लेखोरांनी हे कृत्य केले असल्याचे स्थानिक माध्यमांनी म्हटले.

या हल्ल्यात अन्य दोन महिलादेखील जखमी झाल्या. एका ६१ वर्षीय आणि ३० वर्षीय महिलेला गोळी लागली. हल्ला केल्यानंतर हल्लेखोर घटना स्थळावरून फरार झाले. दोन्ही जखमी महिलांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. दोघींचीही प्रकृती ठीक असून जीविताला धोका नसल्याची माहिती आहे. सिलवेस्टरची पाच हजार डॉलरच्या जामिनावर सुटका करण्यात आली होती. हल्लेखोरांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.


man-shot-as-many-as-64-times-in-apparent-ambush-outside-jail

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area