हर्सूल कारागृहात दोघांकडे मोबाइल

 

औरंगाबाद: हर्सूल कारागृहात शिक्षा कापत असलेल्या दोन बंदिवानाकडे दोन मोबाइल आढळले असल्याचे प्रकरण समोर आले आहे. हर्सूल जेल प्रशासनाला मिळालेल्या गुप्त माहितीवरून सर्च ऑपरेशन केल्यानंतर दोन बंदिवानाकडे हे मोबाइल आढळले आहेत. या प्रकरणी हर्सूल कारागृहाच्या कर्मचाऱ्याने दिलेल्या फिर्यादीवरून अक्षय शामराव आठवले आणि विजय शामराव गोयर या दोघा कैद्यांच्या विरोधात हर्सूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


हर्सूल कारागृहाचे तुरूंग अधिकारी अमित चंद्रकांत गुरव (३५, रा. शासकीय निवासस्थान कारागृह निवासस्थान, हर्सूल) यांनी या प्रकरणी हर्सूल पोलिस ठाण्यात दिली होती. त्यानुसार, २३ जुलै रोजी पाच अधिकारी आणि सात कर्मचाऱ्यांचा एका विशेष झडती पथक तयार करण्यात आला होता. हर्सुल कारागृहातील काही कैद्यांकडे मोबाइल असल्याची माहिती मिळाली. त्यामध्ये या दोन कैद्यांकडे मोबाइल आढळून आले. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरिक्षक मारोती हरी खिल्लारे हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area