मुंबईतील कुर्ल्यात टीसीची प्रवाशाला बेदम मारहाण; गुन्हा दाखल

 

मुंबई : चालताना धक्का लागल्याने निर्माण झालेल्या वादात मध्य रेल्वेच्या तिकीट तपासनीसाने (टीसी) प्रवाशाला बेदम मारहाण केली. मनीष उरणकर असे या टीसीचे नाव आहे. त्याच्याविरोधात कुर्ला रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.


वरळी येथील कपडा सूट विकणारे ४७वर्षीय अब्दुल हे कुर्ला टर्मिनस येथे तिकीट आरक्षणाबाबत चौकशी करण्यासाठी गेले होते. यावेळी टर्मिनसमधील बुकिंग हॉलमध्ये त्यांचा तिकीट तपासनीस मनीष यांना धक्का लागला. यामुळे या दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. रागाच्या भरात मनीष यांनी अब्दुल यांना पकडून मारहाण करण्यास सुरुवात केली. अखेर टर्मिनसमधील आरपीएफ आणि अन्य प्रवाशांनी मध्यस्थी करत हाणामारी थांबवली.या मारहाणीनंतर अब्दुल यांनी तातडीने कुर्ला रेल्वे पोलिस ठाणे गाठत संबंधित टीसीविरुद्ध तक्रार दाखल केली. या प्रकरणी कुर्ला रेल्वे पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येत असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area