मुंबई : मुंबईतील मुसळधार पावसामुळे चेंबूरमधील वाशीनाका परिसरात घरांवर संरक्षक भिंत कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत 18 जणांचा मृत्यू झाला आहे. तर पाच जण जखमी झाले आहे. या दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना शासनाकडून प्रत्येकी 5 लाख रुपये दिले जाणार आहेत. तर जखमींवर मोफत उपचार केले जाणार आहेत, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली आहे.
मृत व्यक्तींच्या नावाची संपूर्ण यादी
नाव – वय
- मीना सुर्यकांत झिमूर – 45 (स्त्री)
- पंडित राम गोरसे – 50 (पु)
- शीला गौतम पारधे – 40 (स्त्री)
- शुभम गौतम पारधे – 10 (पु)
- श्रृती गौतम पारधे – 15 (स्त्री)
- मुकेश जयप्रकाश अग्रहारी – 25 (पु)
- जीजाबाई तिवारी – 54 (स्त्री)
- पल्लवी दुपारगडे – 44 (स्त्री)
- खुशी सुभाष ठाकूर – 2 (स्त्री)
- सुर्यकांत रविंद्र झिमुर – 47 (पु)
- उर्मिला ठाकूर – 32 (स्त्री)
- छाया पंडित गोरसे – 47 (स्त्री)
- अपेक्षा सुर्यकांत झिमुर – 20 (स्त्री)
- प्राची पंडित गोरसे – 15 (स्त्री)
- अनोळखी – 26 (पु)
- अनोळखी – 26 (पु)
🛑 जखमींच्या नावाची संपूर्ण यादी
नाव = वय
- संजय गायकवाड – 40 (पु)
- विजय खरात – 40 (पु)
- अक्षय सुर्यकांत झिमुर – 26 (पु)
- लक्ष्मी आबाजी गंगावणे – 40 (स्त्री)
- विशाखा गंगावणे – 15 (स्त्री)
नेमक काय घडलं?
मुंबईसह उपनगरात रात्रीपासून पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. मुंबईच्या सर्व उपनगरात पावसाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. मुंबईतील मुसळधार पावसामुळ चेंबूरच्या वाशीनाका परिसरातील भारत नगर बी ए आर सी संरक्षक भिंत कोसळल्याची घटना घडली आहे. या भिंतीलगत असणाऱ्या काही झोपड्यांवर ही भिंत कोसळली. तर दुसरीकडे एकूण तीन घरांवर झाड आणि संरक्षक भिंत पडून घरांचे नुकसान झाले आहे. यात अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. आज सकाळी सातच्या सुमारास दुर्घटना घडली आहे. यात 18 जणांचा मृत्यू झाला.
केंद्राचीही 2 लाखांची मदत
मुंबईच्या चेंबूर आणि विक्रोळी भागामध्ये झालेल्या दुर्घटनांमुळे आत्तापर्यंत 23 जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त एएनआयनं दिलं आहे. या दुर्घटनांमधील मृतांच्या नातेवाईकांना केंद्र सरकारने आर्थिक मदत जाहीर केली आहे. मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय आपत्ती निधीमधून 2 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. त्यासोबतच, या दुर्घटनांमध्ये जखमी झालेल्या व्यक्तींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
तर दुसरीकडे राज्य शासनाकडून या दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना शासनाकडून प्रत्येकी 5 लाख रुपये दिले जाणार आहेत. तर जखमींवर मोफत उपचार केले जाणार आहेत, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली.