नागपूर : खरेदीसाठी गेलेल्या महिलेच्या बॅगमधून सोन्याचे दागिने लंपास; गुन्हा दाखल

 

नागपूर : महाल परिसरात खरेदीसाठी गेलेल्या महिलेच्या बॅगमधून ६० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने लंपास करण्यात आले. ही घटना २३ जूनच्या सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास घडली. शोभा अशोकराव भापकर (वय ६७, रा. वर्धा) असे फिर्यादीचे नाव आहे. त्या सध्या गणेशपेठ परिसरात रजत संकुल येथे वास्तव्यास आहेत. भापकर २३ जूनला महालातील केळीबाग रोडवर खरेदीसाठी गेल्या होत्या. त्यावेळी चोरट्याने त्यांची नजर चूकवून त्यांच्य बॅगमधून सोन्याचे दागिने लंपास केले. त्यानंतर त्या घरी परतल्या व बॅग तशीच ठेवली होती. नंतर काही दिवसांनी त्यांनी बॅग तपासली असता त्यांना दागिने दिसले नाहीत. त्यांनी पोलिसांत तक्रार दिली. कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
तरुणीचा विनयभंग
नागपूर : युवकाने तरुणीशी भांडण करून तिचा हात पकडत विनयभंग केला. ही घटना गिट्टीखदान पोलिस ठाण्यांतर्गत उघडकीस आली. राकेश राजू नायडू (वय ३५) असे आरोपीचे नाव आहे. ही २१ वर्षीय तरुणी राकेशच्या शेजारी राहाते. ती गुरुवारी संध्याकाळी ६ वाजता आपल्या घराच्या समोर बाहेर बसलेली असता राकेश तिला एकटक बघत होता. तिने त्याला हटकले असता त्याने तिच्याशी भांडण करून तिचा हात पकडला व तिच्याशी अश्लील चाळे केले, अशी तक्रार तरुणीने पोलिसांत दिली. पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करून राकेशला अटक केली.

    Post a Comment

    0 Comments
    * Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

    Ads Area