बोगस जात प्रमाणपत्राआधारे झाला डॉक्टर; पोलिसांकडून गुन्हा दाखल

नाशिक:

तडवी अनुसूचित जाती-जमातीच्या बनावट जात प्रमाणपत्र, तसेच जात वैधता प्रमाणपत्राद्वारे नाशिकला डॉक्टरकीचे शिक्षण पूर्ण करून मुंबईत प्रॅक्टिस करणाऱ्या तरुणाविरोधात आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयिताने डॉ. वसंतराव पवार मेडिकल कॉलेजमधून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. डॉ. इसलाहुझामा सल्लालुद्दिन अन्सारी (वय २८, रा. भायखळा) असे गुन्हा दाखल झालेल्या डॉक्टरचे नाव आहे. पोलिसांकडे आलेल्या निवावी अर्जानुसार चौकशी होऊन आग्रीपाडा (मुंबई) पोलिस ठाण्यातील निरीक्षक बाळासाहेब राऊत यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल झाला आहे. संशयित डॉ. अन्सारीने २०१०-११ या शैक्षणिक वर्षात प्रवेश मिळवित एमबीबीएस पदवी घेऊन मुंबईत प्रॅक्टिस सुरू केली, अशी तक्रार आहे. आग्रीपाडा पोलिसांकडे आलेल्या निनावी तक्रारीनुसार पोलिसांनी चौकशी केली असता, त्यात हा प्रकार उजेडात आला. संशयित डॉ. अन्सारीच्या बहिणीविरोधातही पु्ण्यात अशी तक्रार आली होती. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area