प्रेमास नकार दिल्याने अल्पवयीन मुलीस बेदम मारहाण; नराधमाला अटक

नाशिक:  प्रेमास नकार दिल्याने एकाने कुटुंबियांस जीवे ठार मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीस बेदम मारहाण करीत विनयभंग केल्याची घटना पंचवटीत घडली. पीडितेच्या तक्रारीवरून पंचवटी पोलिसांनी राहुल विनोद वाघेला (रा. मेरी कॉलनी) यास अटक केली आहे. संशयिताविरोधात विनयभंग आणि बालकांचा लैंगिक अत्याचार प्रतिबंधक (पोक्सो) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकटी असल्याची संधी साधून संशयिताने तिला गाठले. यावेळी त्याने अंगलट केली. मुलीने आरडाओरड केली. मात्र आरोपीने तिला लाथाबुक्यांनी व कमरेच्या पट्ट्याने मारहाण केली. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक गवळी करीत आहेत.

विवाहीतेसह तरूणीची आत्महत्या

बुधवार पेठ येथील आसराची वेस परिसरात राहणाऱ्या २३ वर्षीय महिलेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. दीपाली शिवाजी व्यवहारे असे या महिलेचे नाव आहे. दीपाली यांनी रविवारी (दि. ११) गळफास घेतल्याचे आढळून आले. या प्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर, पूजा नामदेव गांगुर्डे (२४, रा.पंचशील अपार्टमेंट, राम गार्डनजवळ) या तरुणीने रविवारी दुपारी राहत्या घरात गळफास लावून घेतला होता. याबाबत सुवर्णा मोरे यांनी खबर दिल्याने पंचवटी पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area