नाशिकमध्ये 'ऑनर किलींग'; समाजातील बदनामीपोटी परधर्मीय महिलेचा खून

 

निफाड : मुलाने परधर्मीय आणि वयाने मोठ्या असलेल्या महिलेशी विवाह केल्यास समाजात बदनामी होईल, या भीतीपोटी आई आणि भाऊ या दोघांनी मिळून महिलेचा गळा दाबून खून केल्याचा प्रकार रानवड येथे उघडकीस आला. मृत महिला आणि मारेकरी उत्तर प्रदेशातील असून, प्रेम प्रकरणातून हा खून झाल्याचे स्पष्ट झाले आहे.


नांदुर्डी (ता. निफाड) परिसरात तीन दिवसांपूर्वी एका महिलेचा मृतदेह आढ‌ळून आला होता. प्रेम प्रकरणातून तिचा खून झाल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून, संशयित महिला आरोपी सवरीदेवी अग्रवाल फरार आहे. निफाड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पालखेड डाव्या कालव्याच्या भरावात महिलेचा मृतदेह आढळून आला होता. या महिलेचे फोटो प्रसारमाध्यमांत व्हायरल केल्यानंतर पोलिसांनी मारेकऱ्यांचा शोध घेतला. संशयित रवी ब्रिजलाल अग्रवाल याने पोलिसांना घडलेली हकीकत सांगितली. मृत महिला ही मुस्लिम समाजाची असून, तिचे आरोपीचा भाऊ लाला उर्फ सुभाष अग्रवाल याच्याशी प्रेमसंबंध होते. ती वयानेही अधिक असल्याने हा विवाह झाल्यास समाजात बदनामी होईल म्हणून सवरीदेवी हिने या दोघांना उत्तर प्रदेश येथून गोड बोलून रानवड येथे आणले. लाला याला मोटारसायकल घेण्यासाठी १४ जुलै रोजी पुणे येथे पाठवून दिले आणि त्याच रात्री साडेआठ ते ११ वाजेदरम्यान रवी व त्याच्या आईने महिलेला गावात फिरून येऊ असे सांगत मोटारसायकलवर ट्रिपल सीट बसवले. रानवड कारखान्याजवळ गाडी थांबवत तिथे रवीने महिलेचे हात धरले, तर सवारीदेवी हिने गळा दाबून तिचा खून केला. त्यानंतर रवीचा मित्र मुमताज खान शमशुल्ला (५१) याच्या मदतीने मृतदेह पालखेड बंधाऱ्याच्या शिवारात टाकून दिला. पोलिसांनी रवी अग्रवाल (२८), मुमताज शमशुल्ला(५१) या दोघांना अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता, त्यांना दहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. संशयित सवरीदेवी व प्रियकर लाला अद्याप फरार आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area